ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला: पंकजा मुंडे
रोहिदास हातागळे, बीड: ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करत दिली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी आज (3 मार्च) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. याविषयी मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत पुढचा निर्देश देत नाही, तोपर्यंत […]
ADVERTISEMENT
रोहिदास हातागळे, बीड: ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करत दिली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी आज (3 मार्च) सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. याविषयी मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
ADVERTISEMENT
सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत पुढचा निर्देश देत नाही, तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत असे स्पष्ट झाले आहे.
यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट केले आहे, त्या म्हणाल्या, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ‘धक्का’ नसून ‘धोका’ मिळाला आहे. राज्यातील ओबीसींचे राजकीय व्यासपीठ, संधी आणि भविष्य संपवण्याचा अधिकार कोणाला नाही. ओबीसी राजकीय आरक्षण नाही तर निवडणूक नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ओबीसी च्या राजकीय आरक्षणाला 'धक्का' नसून 'धोका' मिळाला आहे…राज्यातील ओबीसी चे राजकीय व्यासपीठ,संधी आणि भविष्य संपवण्याचा अधिकार कोणाला नाही..ओबीसी राजकीय आरक्षण नाही तर निवडणूक नाही..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 3, 2022
ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी जानेवारी महिन्यात जी सुनावणी झाली त्यावेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की मागासवर्ग आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा. यानंतर मागासवर्ग आयोगाने दोन आठवड्यांमध्ये अहवाल तयार केला. मात्र हाच अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे.
ओबीसी आरक्षणाशिवायच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर जो अहवाल दिला आहे त्यातून ओबीसींचं राजकीय प्रतिनिधीत्वापासून वंचित आहेत हे दिसून येत नाही असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवत हा अहवाल नाकारला आहे.
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात न्या. ए एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी.टी. रवीकुमार यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यांनीच ओबीसींच्या आरक्षणावर राजकीय बंदी आणली त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने याचिका दाखल केली. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे मागासवर्गीय आयोगाचा अहवालही सादर करण्यात आला. मात्र हा अहवाल फेटाळण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्र सरकारने मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. या अहवालात राजकीय प्रतिनिधित्वाची आकडेवारी योग्य नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात अशाही सूचना दिल्या आहेत.
ओबीसी आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकारला झटका, सुप्रीम कोर्टाने मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला
छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे ?
कोर्टामध्ये विकास गवळी हे आमचे मित्र आधीपासून विरोध करत आहेत. आम्ही ओबीसींच्या भल्यासाठीच हे करतो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आता निवडणुका अत्यंत जवळ येऊन ठेपल्या आहेत. अशात अंतरिम अहवाल मंजूर केला जावा अशी आमची अपेक्षा होती. आयोगाने जो अहवाल दिला तो त्यामध्ये आता विचारणा करण्यात आली की राजकीय डेटा कुठे आहे?
ओबीसींना राजकीय आरक्षण कुठे कसं मिळालं आहे? त्याचा काय अभ्यास केला आहे याची विचारणा सुप्रीम कोर्टात झाली. मात्र तो सगळा डेटा इलेक्शन कमिशनकडे आहे. तो आम्हाला दिलेला नाही. तशी भूमिका कोर्टात सांगण्यात आली. त्यानंतर कोर्टाने सांगितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तारीख निघून गेली आहे तिथे निवडणुका घ्या. इलेक्शन कमिशनने डेटा दिला की आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात तो सादर करू असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT