Pankja Munde यांची नाराजी कायम? BJP OBC मोर्चाच्या बैठकीला गैरहजेरीने चर्चांना उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी अद्याप कायम असल्याचं पहायला मिळतंय. मुंबईत आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसमोर शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडेंनी राज्य नेतृत्वाला इशारा दिला होता. यानंतर भाजपच्या ओबीसी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही पंकजा यांनी दांडी मारल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. सोमवारी पार पडलेल्या या […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी अद्याप कायम असल्याचं पहायला मिळतंय. मुंबईत आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसमोर शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडेंनी राज्य नेतृत्वाला इशारा दिला होता. यानंतर भाजपच्या ओबीसी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही पंकजा यांनी दांडी मारल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
सोमवारी पार पडलेल्या या बैठकीत पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोन महत्वाचे ओबीसी चेहरे गैरहजर होते. मध्यंतरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन भाजपने राज्यात आंदोलन केलं होतं, या आंदोलनात बावनकुळे आणि पंकजा मुंडे मैदानात उतरल्या होत्या. परंतू मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंना डावलण्यात आल्यामुळे दुखावण्यात आलेल्या पंकजा मुंडेंची नाराजी अद्याप कायम असल्याचं चित्र दिसतंय.
दरम्यान, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नेते अनुपस्थित राहिल्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रीया भाजपने दिली आहे. सोमवारी पार पडलेली बैठक ही ओबीसी मोर्चाची बैठक होती. पंकजा मुंडे या राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्य आहेत. त्यामुळेच त्या या बैठकीला हजर नव्हत्या अशी माहिती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
हे वाचलं का?
सोमवारी पार पडलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं. हेच आरक्षण परत मिळवण्यासाठी ओबीसी जागर अभियान राबवण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT