कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार; कच्च्या तेलाचे दर भिडले गगनाला
पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून, १४ वर्षांनंतर प्रथमच प्रति बॅरल १३० डॉलरवर पोहोचले आहेत. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर कोणत्याही क्षणी इंधनाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात होऊ शकते. रशिया-युक्रेन युद्धाची झळ जगभरात बसताना दिसत आहेत. त्यातच […]
ADVERTISEMENT
पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून, १४ वर्षांनंतर प्रथमच प्रति बॅरल १३० डॉलरवर पोहोचले आहेत. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर कोणत्याही क्षणी इंधनाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात होऊ शकते.
ADVERTISEMENT
रशिया-युक्रेन युद्धाची झळ जगभरात बसताना दिसत आहेत. त्यातच कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमध्येही भर पडली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १३० डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. तब्बल १४ वर्षांनंतर दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानं भारतीयांनी यांच्या झळा बसू शकतात.
देशात नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. नोव्हेंबरमध्ये देशातील पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लीटर १०० रुपयांच्यावर गेले होते. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून इंधनावरील करात कपात करण्यात आली. तर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली. त्यानंतर आजपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेल्या करकपातीवेळी कच्च्या तेलाचे दर जवळपास प्रति बॅरल ८२ डॉलर इतके होते. मात्र आता त्यात प्रचंड वाढ झाली आहे.
हे वाचलं का?
भारतातील सध्याच्या धोरणानुसार तेल वितरक कंपन्यांकडून दररोज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार किंमती निर्धारित केल्या जातात. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय तेल बाजारातच कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असल्याने भारतातही इंधनाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली जात नसल्याचा आरोप सरकारवर केले जात आहे. ५ राज्यांतील निवडणुकांमुळे नोव्हेंबरपासून सरकारने इंधनाचे दर वाढवले नाही, असंही विरोधकांकडून म्हटलं जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘पटापट पेट्रोलच्या टाक्या भरून घ्या. मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे’, असं ट्विट करत सरकारला टोला लगावला होता.
ADVERTISEMENT
यापूर्वी असं घडलंय…
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याबद्दल आता बोललं जात आहे. मात्र, यापूर्वी असं घडलेलं आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरूवात झाली होती. लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली होती.
पश्चिम बंगालसह पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही स्थिर असलेले पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याचं दिसलं होतं. त्याचबरोबर २०१८ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा आणि २०१७ मध्ये झालेल्या गुजरात निवडणुकीवेळी असंच घडलं होतं. त्यामुळे आता पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT