किरण गोसावीला पिंपरी-चिंचवड पोलीस घेणार ताब्यात?; आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार असलेल्या किरण गोसावीच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. किरण गोसावीविरुद्ध पिंपरी-चिंचवडमध्येही एक गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस किरण गोसावीला ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा असलेला सरकारी साक्षीदार किरण गोसावी याच्या विरोधात आता नवीन गुन्हा दाखल झाला आहे. किरण विरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. किरण गोसावी सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात आहे.

KP Gosavi: एक सेल्फी आणि किरण गोसावी थेट पुण्याच्या येरवडा कारागृहात!

हे वाचलं का?

दरम्यान, आता पिंपरी-चिंचवडमधील भोसरी पोलिसांनी किरण गोसावीविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला असून, लवकरच पिंपरी-चिंचवड पोलीस किरण गोसावीला येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरातील विजयकुमार सिद्धलिंग कानडे याने किरण गोसावी याच्या शिवा इंटरनॅशनल नावाच्या कंपनीशी ऑनलाइन संपर्क साधला होता. त्यावरून किरण गोसावी याने विदेशात विजयकुमारला नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत ईमेल पाठवला होता.

ADVERTISEMENT

पुणे पोलिसांनी अटक करण्याआधी किरण गोसावी काय म्हणाला?

ADVERTISEMENT

हे काम करण्यासाठी किरण गोसावीने 2 लाख 25 हजार रुपये विजयकुमारकडून त्याच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विजयकुमारने पैसे जमा केले होते. पैसे जमा करून 6 वर्षे झाली तरीही विजय कुमारला नोकरी मिळाली नाही आणि त्याबद्दल किरण गोसावीचं काही उत्तरही मिळालं नाही. त्यामुळे विजय कुमार यांनी आता किरण गोसावीविरुद्ध पिंपरी-चिंचवमधील भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विजयकुमार कानडे प्रकरणाची पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही दखल घेतल्याचं समजतं. पिंपरी-चिंचवड़ पोलीस किरण गोसावी याला लवकरच येरवडा कारागृहातून आपल्या ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे किरण गोसावीच्या चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT