पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १० वाजता देशवासियांशी संवाद साधणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन याची घोषणा करण्यात आली आहे. भारताने नुकताच कोरोना लसीचे १०० कोटी डोस दिल्याबद्दलचा आनंदोत्सव साजरा केला. त्या पार्श्वभूमीवर अगदी काही तासांमध्येच मोदींनी देशवासियांशी संवाद साधायचं ठरवल्यामुळे मोदींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ADVERTISEMENT

याआधीही अनेक महत्वाच्या प्रसंगांमध्ये नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला आहे. सध्या लसीकरणात गाठलेला महत्वाचा टप्पा, येणारा दिवाळीचा सण आणि तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती यासारख्या विषयांवर मोदी देशवासियांशी संवाद साधू शकतील अशी शक्यता आहे.

देशात १६ जानेवारी २०२१ रोजी पहिला डोस दिला गेला. अपुरं उत्पादनामुळे देशातील लसीकरणाची सुरुवात संथगतीने झाली होती. मात्र, नंतर लसीकरणाने गती घेतली. सुरुवातीच्या टप्प्यात देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १ मार्चपासून देशात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्ती आणि सहव्याधी असणाऱ्या ४५ वर्षांपुढील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती.

हे वाचलं का?

१ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर १ मे २०२१ पासून देशातील १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या देशात ६३,४६७ केंद्रावर लसीकरण केलं जात असून, यात ६१,२७० केंद्र सरकारी आहेत, तर २,१९७ केंद्र खासगी आहेत.

महाराष्ट्र देशात कोणत्या क्रमांकावर?

ADVERTISEMENT

भारताने शंभर कोटी डोस देण्याची विक्रमी कामगिरी गुरूवारी केली. यात सर्वाधिक डोस देणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात 12,21,40,914 डोस देण्यात आले आहेत. तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 9,32,00,708 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 6,85,12,932, गुजरात 6,76,67,900 आणि पाचव्या क्रमांकांवरील मध्य प्रदेशात 6,72,24,286 डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT