PM Narendra Modi : ऑक्सिजनचा तुटवडा कुणालाही भासू नये यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू
PM Narendra modi कोरोना विरोधात आज देश पुन्हा एक नवी लढाई लढतो आहे. काही दिवसांपूर्वी स्थिती बरी होती पण आता कोरोना पुन्हा एक नव्या लाटेच्या रूपाने समोर आला आहे. जी पीडा देशवायीसांना सहन करावी लागली आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्या ज्या लोकांनी त्यांच्या आप्त स्वकियांना गमवालं त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. आज घडीला […]
ADVERTISEMENT
PM Narendra modi कोरोना विरोधात आज देश पुन्हा एक नवी लढाई लढतो आहे. काही दिवसांपूर्वी स्थिती बरी होती पण आता कोरोना पुन्हा एक नव्या लाटेच्या रूपाने समोर आला आहे. जी पीडा देशवायीसांना सहन करावी लागली आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्या ज्या लोकांनी त्यांच्या आप्त स्वकियांना गमवालं त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. आज घडीला ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून केंद्र सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करत आहोत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
18 वर्षांवरील सर्वांसाठी लस! असा आहे सरकारचा मास्टर प्लान
आज घडीला राज्यांमधून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. ऑक्सिजन सगळ्या राज्यांना मिळावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. 1 लाख नवे ऑक्सिजन सिलिंडर पोहचवणं, ऑक्सिजन एक्स्प्रेस असो, ऑक्सिजनचे प्रोजेक्ट असो हर तऱ्हेने आम्ही ऑक्सिजनची मागणी पुरवण्याचा प्रयत्न सरकार म्हणून करतो आहोत. देशातल्या फार्मा कंपन्यांनी औषधांचं उत्पादनही वाढवलं आहे. औषध कंपन्यांची मदत आपण घेत आहोत. आपण भाग्यशाली आहोत की आपल्या देशात अत्यंत सबळ असं फार्मा सेक्टर आहे जे चांगली आणि दर्जेदार औषधं तयार करतं असं म्हणून नरेंद्र मोदी यांनी फार्मा सेक्टरचंही कौतुक केलं.
हे वाचलं का?
कुंभमेळा प्रतीकात्मक असला पाहिजे.. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वामी अवधेशानंद यांना फोन
गेल्या वर्षी कोरोनाचे काही रूग्ण जेव्हा समोर आले होते तेव्हाच कोरोनावर लस शोधण्यासाठी काम करणं सुरू केलं. आपल्या संशोधकांनी दिवसरात्र एकत्र करून लसी तयार केल्या आहेत. जगात सर्वात स्वस्त लस भारतात उपलब्ध आहे. आपल्या सगळ्याच आरोग्यविषयक क्षेत्रांनीही चांगलं काम केलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या भारतात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन आहेत त्यामुळे आपण सर्वात वेगवान असा लसीकरण कार्यक्रम सुरू करू शकलो. सर्वात आधी 10 कोटी, त्यानंतर 11 कोटी आणि मग 12 कोटी व्हॅक्सिन डोस दिले गेले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT