पॉझिटिव्ह बातमी, मुंबईत कोरोना रुग्ण होत आहेत कमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई महापालिका हद्दीतील कोरोनाची स्थिती आता सुधारते आहे. मुंबईत दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने कमी झालेली दिसत आहे. तसंच बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असल्याचं दिसत आहे. यामुळे रुग्णालयातील बेडवर देखील ताण कमी झाला आहे.

ADVERTISEMENT

मुंबईमध्ये 1 मे रोजी 3908 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5900 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. म्हणजेच बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा 89 टक्के एवढा आहे. रुग्ण दुप्पटीचा दर हा आता 96 दिवसांवर गेला आहे. तर रुग्णवाढीचा दर 0.70 टक्के आहे.

साधारण 15 दिवसांपूर्वीची कोरोना रुग्णांची संख्या पाहिली तर 15 एप्रिलला मुंबईमध्ये 8217 कोरोना रुग्ण आढळले होते. तर 10 हजार 97 रुग्ण बरे झाले होते. त्यावेळी बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा 82 टक्के होता. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा 42 दिवस इतकाच होता. कोव्हिड वाढीचा दर हा 1.64 टक्के एवढा होता.

हे वाचलं का?

देशात कोरोना रुग्ण वाढताच लॉकडाऊनबाबत पाहा केंद्र सरकारने काय दिला आदेश

दरम्यान, आठवड्याभरानंतर 24 एप्रिलला पहिल्यांदाच रुग्णसंख्या कमी झाल्याचं निदर्शनास आलं. 24 एप्रिलला 5888 कोरोनाचे रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या सतत्याने कमी होऊ लागली.

ADVERTISEMENT

  • 26 एप्रिल

ADVERTISEMENT

  1. बाधित रुग्ण – 3876

  • बरे झालेले रुग्ण – 9150

  • बरे झालेल्या रुग्णांचा दर- 87%

  • रुग्ण वाढीचा दर (19 एप्रिल-25 एप्रिल)- 1.09%

    • 27 एप्रिल

    1. बाधित रुग्ण – 4014

    2. बरे झालेले रुग्ण- 8240

    3. बरे झालेल्या रुग्णांचा दर- 87% एकूण

    4. दुप्पटीचा दर- 68 दिवस

    5. रुग्ण वाढीचा दर (20 एप्रिल – 26 एप्रिल)- 1.01%

    • 28 एप्रिल

    1. बाधित रुग्ण – 4966

    2. बरे झालेले रुग्ण- 5300

    3. बरे झालेल्या रुग्णांचा दर- 87%

    4. दुप्पटीचा दर- 74 दिवस

    5. रुग्ण वाढीचा दर (21 एप्रिल-28 एप्रिल)- 0.93%

    • 29 एप्रिल

    1. बाधित रुग्ण – 4192

    2. बरे झालेले रुग्ण- 5650

    3. बरे झालेल्या रुग्णांचा दर- 88%

    4. दुप्पटीचा दर- 79 दिवस

    5. कोविड वाढीचा दर (22 एप्रिल-28 एप्रिल)- 0.86%

    • 30 एप्रिल

    1. एकूण बाधित रुग्ण – 3925

    2. बरे झालेले रुग्ण – 6380

    3. रुग्णांचा दर- 88%

    4. दुप्पटीचा दर- 87 दिवस

    5. कोविड वाढीचा दर (23 एप्रिल-29 एप्रिल)- 0.78%

    Corona Treatment: 90 टक्के कोरोना रुग्ण ‘ही’ गोष्ट करुन घरीच होतील बरे, दिग्गज डॉक्टरांनी दिली माहिती

    मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनीदेखील त्यांच्या ट्विटमध्ये मुंबई महापालिकेतली कोरोनाची स्थिती सुधारत असल्याचं सांगितलं आहे. पण, असं असतानाही शस्त्र खाली ठेवता कामा नये असा उल्लेखही त्यांनी या ट्विटमध्ये केला आहे.

    मुंबई महापालिकेकडून दररोज जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीवरुन रुग्णसंख्या कमी होत असल्याचं समोर येत आहे. तसंच अश्विनी भिडे यांनी देखील त्यांच्या ट्विटमध्ये मुंबई महापालिकेतील कोरोनाचे रुग्ण हळूहळू घटत असल्याचं सांगितलं आहे. मात्र असं असलं तरी मुंबईकरांना एवढ्यातच निर्धास्त होऊन चालणार नाही. कारण अद्यापही कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी आपल्याला योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT