राज्यपालांच्या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास केला जातोय -प्रविण दरेकर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाचे सोमवारी महाराष्ट्रभर पडसाद उमटले. राज्यपालांवर टीका करण्यात आली. याच मुद्द्यावर भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘राज्यपालांच्या विधानाचं समर्थन करता की निषेध’, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मूळ विधानाचा विपर्यास करण्यात आला असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

सोलापूरमध्ये प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, “भाजपने संपूर्ण राज्यभर देशभक्तीच्या उद्देशाने एक अभियान सुरू केलं आहे, ‘नवाब मलिक हटाव, देश बचाव.’ नवाब मलिकांवर सूड भावनेनं कारवाई केली जात असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न होतोय. राज्यभर वस्तुस्थिती मांडली जाणार आहे.”

समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते?: राज्यपाल कोश्यारी

हे वाचलं का?

“अनेक प्रकरणात भाजपचा कुठेही संबंध नाही. अनिल देशमुखांवर कारवाई होण्यासंदर्भात भाजपचा काहीही संबंध नव्हता. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी खंडणीची तक्रार केली. त्यात त्यांचं नाव होतं. प्रताप सरनाईकांच्या प्रकरणातही भाजपचा संबंध नव्हता. माजी वनमंत्री राठोडांनी एका लेकीला आत्महत्या करण्याची वेळ आणली. त्यातही भाजप नव्हती”, असं मत दरेकरांनी मांडलं.

“नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य केलं, तर अटक झाली. अल्पसंख्याक मंत्री मलिक हे किरीट सोमय्यांना आयटम गर्ल म्हणाले, संजय राऊतांनी शिव्या दिल्या. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. नाना पटोले हे मोदींना मारू शकतो म्हणाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी एका व्यक्तीला मारहाण केली. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला,” असंही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

“नवाब मलिकांना देशभक्त बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनआएने गुन्हा दाखल केल्यानंतर आणि छापे टाकले. जबाब नोंदवले. त्यात नवाब मलिकांचा संबंध पुढे आला. शाहवली तुरुंगात आहे. त्याच्याबरोबर व्यवहार केला. मूळ भूखंड मालकाला एक रुपयाही दिला नाही.”

ADVERTISEMENT

“नवाब मलिकांची चौकशी करून अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने ईडी कोठडी दिली आहे. मलिकांच्या वकिलांनी युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला. समन्सशिवाय अटक करता येत नाही, असंही त्यांचे वकील म्हणाले. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यानुसार अटक करू शकते, असं न्यायालयाने सांगितलंय. मलिकांना ईडी कोठडी भाजपने दिलेली नाही. न्यायालयाने दिली आहे,” अशी टीका दरेकरांनी केली.

“महाविकास आघाडी सरकार कुणाची बाजू घेतं आहे. टेरर फंडिंग करणाऱ्या दाऊदची की, अतिरेक्यांशी व्यवहार करणाऱ्यांची? गांधीजींच्या पुतळ्यासमोर गुन्हेगार मलिकांसाठी आंदोलन करत आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ आंदोलनात सहभागी होतंय.”

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाबद्दल दरेकर म्हणाले, “राज्यपालांचं वक्तव्य तसं नव्हतं. त्यांनी गुरू आणि शिष्याच्या नात्यासंदर्भात तसं सांगितलं. त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. राज्यपालांना छत्रपतींबद्दल आदर आहे आणि त्यांनी वारंवार आपल्या वक्तव्यातून दाखवलं आहे. यांची (महाविकास आघाडी) एक स्टाईल आहे की, कोणताही विषय आला की राजकारण करायचं. सरकारच्या अपयशांवरून लोकांची नजर हटवायची, हा त्यांचा नियोजनाचाच भाग आहे,” असं मत दरेकरांनी मांडलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT