भारतीय नौदलाची ताकद वाढणार ! वागशीर पाणबुडीचा जलावतरण कार्यक्रम संपन्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

भारतीय नौदलाच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा ठरला आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने निर्माण केलेल्या प्रोजेक्ट 75 च्या स्कॉर्पिन वर्गातली सहावी पाणबुडी ‘वागशीर’चा जलावतरण सोहळा आज संपन्न झाला.

हे वाचलं का?

वागशीरचा जलावतरण सोहळा आज डिफेन्स सिक्रेटरी डॉ. अजय कुमार शर्मा यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

ADVERTISEMENT

वागशीर ही स्कॉर्पिन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. आजचा जलावतरण सोहळा पार पडल्यानंतर पुढील वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ ही पाणबुडी समुद्रात चाचणीसाठी उतरणार आहे.

ADVERTISEMENT

ही चाचणी पार पडल्यानंतर वागशीर पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. सायलंट किलर म्हणून ओळख असलेल्या वागशीरच्या समावेशानंतर भारतीय नौदलाचं बळ आणि सामर्थ्य अधिक वाढणार आहे.

माझगाव डॉकने तयार केलेल्या वागशीर पाणबुडीत अत्याधुनिक तंत्रज्ञानसह स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे शत्रुपक्षाच्या रडारमध्ये ही पाणबुडी टिपली जाणार नाहीये.

यासोबतच वागशीर पाणबुडीमध्ये advanced acoustic absorption technique, low Radiated noise level, आणि गायडेड वेपन्सचा वापर करण्यात आला आहे.

समुद्री चाचणी पूर्ण झाल्यानंतरच वागशीरला नौदलाच्या ताफ्यात सहभागी होण्यासाठी हिरवा कंदील मिळेल.

या पाणबुडीमध्ये 18 टोरपीडो ट्युब्स आहेत. या पाणबुडीची लांबी 67.5 मीटर तर उंची 12.3 मीटर असून 350 मीटरपर्यंत ही पाणबुडी समुद्रात खोलवर जाऊ शकते. शिवाय पंचेचाळीस ते पन्नास दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करु शकते.

याशिवाय वागशीर पाणबुडीच्या सहाय्याने अँटी सरफेस वारफेअर, अँटी सबमरीन वॉर फेअर , इंटेलिजन्स गेदरिंग, एरिया सर्विलन्स या सारखी भारतीय नौदल करु शकणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT