दुधात काळा पदार्थ, प्रकरण मिटवा नाहीतर बदनामी करु ! चितळे डेअरीकडे खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक
बाकरवडी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या चितळे डेअरीच्या दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचं सांगत, FDA कडे तक्रार न करण्यासाठी २० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील तीन आरोपींपैकी एक महिला असून ही महिला पुण्यातील एका इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असल्याचं कळतंय. दुकान बंद करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी […]
ADVERTISEMENT
बाकरवडी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या चितळे डेअरीच्या दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचं सांगत, FDA कडे तक्रार न करण्यासाठी २० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील तीन आरोपींपैकी एक महिला असून ही महिला पुण्यातील एका इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
दुकान बंद करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपींनी चितळे डेअरकीडे खंडणीची मागणी केली होती. पेशाने शिक्षक असलेल्या पुनम परदेशी यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ई-मेलद्वारे आणि फोनवरुन दुधात काळा पदार्थ सापडल्याची तक्रार केली. याविरोधात FDA कडे तुमच्याविरोधात तक्रार करते, हे प्रकरण लवकर मिटवा नाहीतर तुमचे दुकान बंद करुन बदनामी करु अशी धमकी देत परदेशी यांनी ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली.
दरम्यान चितळे डेअरी व्यवस्थापनाने याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेच्या पथकाने याविरोधात गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली. यातील आरोपी महिलेची माहिती काढली असता ती शिक्षिका असल्याचं कळलं. याचवेळी ही महिला चितळेंचं दुध वापरतच नसल्याचंही समोर आलं. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
हे वाचलं का?
चितळे डेअरीने पाच लाख देण्याची तयारी दाखवल्यानंतर या महिलेने खंडणीची रक्कम वाढवत २० लाखांची मागणी केली. यानंतर पोलिसांनी बनावट नोटांचं बंडल तयार केलं. यानंतर नोटा स्विकारताना चारही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आलंय. यातील आरोपी पूनम परदेशी ही पुण्यातील एका नामांकित शाळेत शिक्षिका असून सुनील परदेशी आणि करण परदेशी यांचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. सुनील, किरण यांच्यावर याआधीही गुन्ह्याची नोंद झालेली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT