Pune व्यापारी संघटना 3 ऑगस्टला करणार घंटानाद आंदोलन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Corona विषाणू प्रतिबंधाचे नियम पाळून आज देखील दुकाने सुरू आहेत. यापुढे देखील आम्ही सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवणार आहोत, मात्र राज्य सरकारने संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देत नाही. याचाच निषेध म्हणून व्यापारी महासंघाकडून 3 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्यास, दुसर्‍या दिवशी आम्ही 7 पर्यंत दुकाने सुरू ठेवणार आहे. अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ADVERTISEMENT

यावेळी फत्तेचंद रांका म्हणाले की, मागील दीड वर्षापासून करोना विषाणूमुळे व्यापारी वर्ग संकटात आला आहे. पुणे शहरात जवळपास 40 हजारांहून अधिक व्यापारी आहेत. ते सर्व आर्थिक संकटात सापडले असून या काळात दोन व्यापाऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहे. अजून किती व्यापाऱ्याची आत्महत्या होण्याची वाट हे सरकार पाहणार आहे. तसेच या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत अनेक वेळा चर्चा झाली. ते केवळ म्हणतात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, आता आम्ही काय करायचा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

तसेच ते पुढे म्हणाले की, आता शहरातील व्यापारी वर्गाचा वाढता दबाव लक्षात घेता, आम्ही 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 12.15 पर्यंत शहरातील ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने संध्याकाळ पर्यंत न घेतल्यास दुसर्‍या दिवसापासुन संध्याकाळी 7 पर्यंत दुकाने सुरू ठेवणार आहोत, आम्ही आता कारवाईला घाबरणार नाही. कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. तसेच शनिवार आणि रविवारीचे नियम पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

राज्यात सध्या लेव्हल थ्रीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकानं उघडी ठेवण्याची संमती ही दुपारी चार वाजेपर्यंतच देण्यात आली आहे. अशात आता कोरोना रूग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढतं आहे. मात्र तरीही निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. मात्र 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत. या 11 जिल्ह्यांमध्ये पुणेही आहे. त्यामुळेच व्यापारी आता आंदोलन करणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT