शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेला अभिनेता दीप सिद्धूचा अपघाती मृत्यू, व्हीडिओही समोर
पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता दीप सिद्धूच्या (Deep sidhu) गाडीचा अपघात झाला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, तोपर्यंत दीप सिद्धूचा मृत्यू झालेला होता. शेतकरी आंदोलन आणि लाल किल्ल्यावर उसळलेल्या हिंसाचारामुळे देशभरात चर्चेत आलेल्या अभिनेता दीप सिद्धूच्या गाडीला मंगळवारी रात्री दिल्लीवरून पंजाबकडे […]
ADVERTISEMENT
पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता दीप सिद्धूच्या (Deep sidhu) गाडीचा अपघात झाला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, तोपर्यंत दीप सिद्धूचा मृत्यू झालेला होता.
ADVERTISEMENT
शेतकरी आंदोलन आणि लाल किल्ल्यावर उसळलेल्या हिंसाचारामुळे देशभरात चर्चेत आलेल्या अभिनेता दीप सिद्धूच्या गाडीला मंगळवारी रात्री दिल्लीवरून पंजाबकडे जात असताना अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दीप सिद्धूसोबत त्यांची होणारी पत्नी रीना रॉय होती. रीना रॉयची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही दुर्घटना केएमपीतील पिपली टोल नाक्याजवळ घडली.
हे वाचलं का?
दीप सिद्धू पांढऱ्या रंगाच्या गाडीतून दिल्लीवरून पंजाबमधील भटिंडाला निघाला होता. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजता रस्त्याच गाडीला अपघात झाला. दीप सिद्धू स्वतःच गाडी चालवत होता. दीप सिद्धूची गाडी ट्रकला जाऊन धडकली. अपघातानंतर दीप सिद्ध आणि रीना रॉय यांना खरखौदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दीप सिद्धूचा मृतदेह सध्या खरखौदा येथील रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दीप सिद्धूच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर त्याच्या चाहत्याकडून शोक व्यक्त केलं जात आहे.
ADVERTISEMENT
दीप सिद्धूचा मृतदेह सध्या खरखौदा येथील रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दीप सिद्धूच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर त्याच्या चाहत्याकडून शोक व्यक्त केलं जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनीही दीप सिद्धूच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ता दीप सिद्धूचं निधन झाल्याचं कळल्यानंतर दुःख झालं. माझ्या सहवेदना आणि प्रार्थना दुःखात बुडालेल्या त्याच्या कुटुंबियांसोबत आहेत, असं मुख्यमंत्री चन्नी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
#WATCH हरियाणा: पंजाबी अभिनेता दीप सिद्धू की हरियाणा में सोनीपत के पास एक सड़क दुर्घटना में मौत हो गई। वीडियो घटनास्थल से है। pic.twitter.com/VIf3qIVr8u
— ANI_HindiNews (@AHindinews) February 15, 2022
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर हिंसाचार उसळला होता. या प्रकरणात पोलिसांनी अभिनेता दीप सिद्धूसह काही जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी एकूण १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेलं होतं.
लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार पुर्वनियोजित कटाचा भाग होता असं दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलेलं होतं. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारावेळी निशाण साहेबही फडकावण्यात आलं होतं. त्यावरून बराच गदारोळ झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT