हो, …तर मी दोषी आहे; Twitter lock होताच राहुल गांधींचा सरकारवर Instagram वरून हल्ला
ट्विटर अकाऊंट लॉक होताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता इन्स्टाग्रामवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राहुल गांधी यांचं ट्विटर हॅण्डल लॉक करण्यात आलं. त्यानंतर नियमांवर बोट ठेवत ट्विटरने राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं. ट्विटरकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर राहुल गांधींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी […]
ADVERTISEMENT
ट्विटर अकाऊंट लॉक होताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता इन्स्टाग्रामवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राहुल गांधी यांचं ट्विटर हॅण्डल लॉक करण्यात आलं. त्यानंतर नियमांवर बोट ठेवत ट्विटरने राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं. ट्विटरकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर राहुल गांधींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून सरकारवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
राहुल गांधी काय म्हणाले?
गुरूवारी पहाटेपासून राजकीय वर्तुळात शाब्दिक दंगल रंगली. ट्विटरने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापाठोपाठ काँग्रेस पक्षाचं अधिकृत ट्विटर हॅण्डल आणि इतर नेत्यांचे ट्विटर अकाऊंटही लॉक केले आहेत. दरम्यान, ट्विटर अकांऊट लॉक करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी इन्स्टावरुन भूमिका मांडत सवाल केला आहे.
हे वाचलं का?
‘जर कुणाबद्दल द्या वा सहानुभूती दाखवणं गुन्हा असेल, तर मी गुन्हेगार आहे. जर बलात्कार आणि खूनाच्या पीडितेला न्याय देण्याची मागणी करणं चूक असेल, तर मी दोषी आहे’, असा रोख सवाल राहुल गांधींनी केला आहे.
‘ते आम्हाला एका प्लॅटफॉर्मवर लॉक करू शकतात; पण लोकांसाठी उठणारा आमचा आवाज बंद करू शकत नाही. द्याभाव, प्रेम आणि न्याय हा वैश्विक संदेश आहे. १३० कोटी भारतीयांना गप्प करू शकत नाही’, अशा शब्दात राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे केंद्रावर टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT
राहुल गांधींचं ट्विटर लॉक करण्यामागे नेमकं काय कारण?
ADVERTISEMENT
पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीतील छावणी परिसरात एका ९ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. आईवडिलांची संमती न घेताच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला होता. घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि तिच्या आईवडिलांसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या फोटोतून पीडितेची ओळख उघड होत असल्याने ट्विटरकडून ते ट्विट हटवण्यात आलं होतं. तसेच ट्विटर हॅण्डल लॉक करण्यात आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT