राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषी ! पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात आज पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनी चौफेर फटकेबाजी केली. मनसे पक्षाचा वर्धापद दिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर होत असल्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दोन वर्षात कोरोना काळात कोणतीही राजकीय सभा न झाल्यामुळे राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरेंनीही आजच्या भाषणात राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य करताना आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी समाचार घेतला.

राजकीय पक्षांनी तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवलं आहे. त्यांना इतिहासाची काहीही पडलेली नाही. आपले राज्यपाल…काही समज वगैरे काही आहे काही नाही. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा….(राज ठाकरे राज्यपालांची नक्कल करतात). मला वाटलं आता हात हातात घेतील आणि भविष्यच सांगायला लागतील. आपका मंगल, बुध…तो कुडमुड्या ज्योतिषी असतो ना तसं. तुम्हाला काही कळतं का त्या विषयातलं? समर्थ रामदास, शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीतरी माहिती आहे का? मग ज्यात आपल्याला काहीही माहिती नाही त्या विषयावर उगाच का बोलायचं असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांचा समाचार घेतला.

हे वाचलं का?

काहीही अभ्यास नसताना एखाद्या विषयावर बोलायचं आणि तुमची माथी भडकवायची हाच धंदा सध्या राज्यात सुरु आहे. वक्तव्य करुन भांडणं लावायची…एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची हा प्रकार सुरु असल्याचं राज ठाकरे म्हणाले. ज्यावेळी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या हे समजलं तेव्हा हा प्रकार शांत झाला, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्यपालांनी केलेल्या विधानाच्या वादाला निवडणुकांशी जोडलं. महापुरुषांना बदनाम करायचं, तुमची माथी भडकवायची आणि मतं मिळवायची हाच एक धंदा सुरु असल्याचं सांगत राज ठाकरेंनी राज्यातल्या राजकारणावर टीका केली.

याव्यतिरीक्त राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, राजकारणाचा घसरलेला स्तर, कोरोना काळात सामान्य लोकांना भेडसावणारे प्रश्न या विषयांवर भाष्य करत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही आपलं लक्ष्य केलं. २ एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर पक्षाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात तुम्हाला खरा पिक्चर पहायला मिळेल असंही राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे शिवतीर्थावरच्या भाषणात राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT