अकोल्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पोलिसांचा कारवाईत हलगर्जीपणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अकोला पोलिसांनी कारवाईदरम्यान कर्तव्य बजावताना दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे एका अल्पवयीन मुलीला सामुहिक अत्याचाराला बळी पडावं लागलं आहे. १७ जूनला अकोला पोलिसांच्या अका पथकाने एका अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटवर धाड टाकली होती. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या ३ मुलींपैकी एका मुलीला तिच्या वयाची शहानिशा न करता पोलिसांनी सोडून दिलं. यानंतर महिन्याभरातच या मुलीवर तिच्या एका मित्राने आणखी काही मित्रांच्या मदतीने सामुहीक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ADVERTISEMENT

सध्या या पीडित मुलीवर अकोल्याच्या स्त्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा महिला बालकल्याण समितीपर्यंत हे प्रकरण पोहचल्यानंतर पोलीसांनाही आपली चूक उमगली असून त्यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

जाणून घ्या काय नेमका घटनाक्रम –

१७ जूला अकोला पोलिसांच्या एका पथकाने मलकापूर भागातील साई अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर कारवाई केली. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी ३ मुली आणि काही ग्राहकांना ताब्यात घेतलं. यावेळी पीडित मुलीने आपलं वय हे १९ वर्ष असल्याचं सांगतिलं.

ADVERTISEMENT

पोलिसांनीही त्यावेळी वयाची शहानिशा न करता समज देऊन या मुलीला सोडून दिलं. परंतू एका महिन्याभरातच ही मुलगी सामुहिक अत्याचाराला बळी पडली. प्रत्यक्षात या मुलीचं वय हे १६ वर्ष आहे. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी तिने जिल्हा महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षांपुढे सांगितली.

ADVERTISEMENT

पीडित मुलगी ही अकोल्याच्या झोपडपट्टी भागात राहणारी असून तिची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. गेल्या महिन्याभरात तिच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांनी तिला मारहाण केल्याचंही समोर आलंय. सध्या ही पीडित मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची दखल पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली असून या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान पोलिसांनीही या प्रकरणी आरोपींवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन अकोल्याचे पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी दिलं आहे.

‘तुला Producer ला खुश करावं लागेल’, असं सांगताच तरुणीने घेतली MNS कडे धाव; यूपीतील निर्मात्याला चपलेने चोप

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT