Bigg Boss 16 Final : रॅपर एमसी स्टॅन ठरला 16 व्या पर्वाचा विजेता
M.C. Stan is name of winner Bigg Boss 16 : मुंबई : तब्बल १९ आठवड्यांपूर्वी सुरुवात झालेल्या बिग बॉस-16 ची अखेर सांगता झाली आहे. रॅपर एम.सी.स्टॅन हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. शोचा होस्ट सलमान खानने स्टॅनचं नाव जाहीर केलं. त्याला चमकदार ट्रॉफीसोबत ३१ लाख ८० हजार रुपयांची बक्षीस रक्कम आणि आय १० Nios कार […]
ADVERTISEMENT

M.C. Stan is name of winner Bigg Boss 16 : मुंबई : तब्बल १९ आठवड्यांपूर्वी सुरुवात झालेल्या बिग बॉस-16 ची अखेर सांगता झाली आहे. रॅपर एम.सी.स्टॅन हा या पर्वाचा विजेता ठरला आहे. शोचा होस्ट सलमान खानने स्टॅनचं नाव जाहीर केलं. त्याला चमकदार ट्रॉफीसोबत ३१ लाख ८० हजार रुपयांची बक्षीस रक्कम आणि आय १० Nios कार मिळणार आहे. स्पर्धेत टॉप-५ मध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालीन भनोट आणि अर्चना गौतम पोहचले होते. अखेरीस इतर चौघांना मागे टाकतं मिळालेले वोट्स आणि परफॉर्मन्सच्या आधारे रॅपर एम.सी.स्टॅन विजेता ठरला आहे. (Bigg Boss season 16 ends with a bang on Sunday.)
सुरुवातीलाच शालीन भनोट या शोमधून बाहेर पडला. तो पाचव्या स्थानावर राहिल्याने त्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं. बाहेर पडल्यानंतर त्याच्या बक्षिसाची रक्कमही ३१ लाख ८० हजार रुपयांपर्यंत वाढली. शालीन बाहेर पडल्यानंतर ‘बिग बॉस’ शोमध्ये शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, एम. सी. स्टॅन आणि अर्चना गौतम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
शालीन पाठोपाठ अर्चना गौतमही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. शोमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिल्याने अर्चना गौतमचा घरातील प्रवास संपुष्टात आला. अर्चनानंतर प्रियंका चहर चौधरीला घराबाहेर काढण्यात आलं. त्यामुळे विजेता शिव होणार की एमसी स्टॅन यावरुन चाहत्यांची उत्सुकता पणाला लागली होती. बिग बॉसच्या बाहेर सेलिब्रिटीजचा शिव ठाकरेला मोठा सपोर्ट मिळाला होता.
MC Stan: पुण्यात रस्त्यावर राहिला, अल्ताफ तडवी कसा बनला स्टॅन, कोण बिग बॉस 16चा विजेता?









