नांदेडचे सपुत्र होणार भारताचे नवे हवाईदल प्रमुख, विवेक चौधरींकडे मोठी जबाबदारी
लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांच्यानंतर आणखी एका मराठी अधिकाऱ्यावर देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील मोठी जबाबदारी मिळणार आहे. मुळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या विवेक चौधरी देशाचे नवे हवाई दल प्रमुख बनणार आहेत. सध्याचे एअर चिफ मार्शल आर.के.एस. भदोरिया यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपणार आहे. यानंतर हवाई दलाच्या प्रमुख पदाची सूत्र ही विवेक चौधरींकडे येणार आहेत. […]
ADVERTISEMENT
लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांच्यानंतर आणखी एका मराठी अधिकाऱ्यावर देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील मोठी जबाबदारी मिळणार आहे. मुळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याचे रहिवासी असलेल्या विवेक चौधरी देशाचे नवे हवाई दल प्रमुख बनणार आहेत. सध्याचे एअर चिफ मार्शल आर.के.एस. भदोरिया यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपणार आहे.
ADVERTISEMENT
यानंतर हवाई दलाच्या प्रमुख पदाची सूत्र ही विवेक चौधरींकडे येणार आहेत.
Govt has appointed Air Marshal VR Chaudhari presently Vice Chief of Air Staff as next Chief of Air Staff after retirement of ACM Bhadauria on 30 #September2021
Air Mshl Chaudhari was commissioned in Fighter stream of #IndianAirForce on 29 Dec 82@AjaybhattBJP4UK @Bhupendrapbjp pic.twitter.com/hRr0NaWg28
— PRO Defence Gujarat (@DefencePRO_Guj) September 22, 2021
विवेक चौधरी हे सध्या भारताचे हवाई दल उप-प्रमुख आहेत. विवेक चौधरी यांचं कुटुंब हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातल्या हस्तारा गावातलं. विवेक चौधरी पुढील शिक्षणासाठी पुण्यात मिलेट्री स्कुलमध्ये दाखल झाले. यानंतर वडिलांच्या नोकरीनिमीत्त विवेक चौधरी यांचं कुटुंब हैदराबादला स्थायिक झालं. चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोळी या गावात जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून काम करायचे. विवेक चौधरी यांचे काका अजुनही नांदेडमध्ये वास्तव्यास आहेत. चौधरी यांनी पुण्याच्या NDA मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं.
हे वाचलं का?
२९ डिसेंबर १९८२ मध्ये विवेक चौधरी हवाई दलात दाखल झाले. मिग आणि सुखोई विमानं उडवण्याचा ३८०० तासांचा अनुभव विवेक चौधरी यांच्या गाठीशी आहे. विवेक चौधरी यांच्या निवडीने त्यांच्या मुळ गावी सध्या आनंदाचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT