अपघातानंतर औरंगाबादचा रस्ता झाला लाल, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबादच्या वैजापूर रस्त्यावर आज एक विचीत्र अपघात पहायला मिळाला. दोन ट्रकच्या धडकेनंतर हा रस्ता पूर्णपणे लाल झालेला पहायला मिळाला. याला कारण ठरलंय, आयशर ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑईल पेंटच्या ट्रकला दिलेली धडक. या अपघातात ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा झालाच परंतू हा रंग रस्त्यावर सांडल्यामुळे सर्व रंग खाली पडून रस्ता लालेलाल झाला.

ADVERTISEMENT

या अपघातात कोणत्याही प्रकारे जिवीतहानी झालेली नसली तरीही ट्रकचालक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकरा वाजल्याच्या सुमारास वैजापूर शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वैजापूर- गंगापुर चौफुलीवर हा अपघात घडला. या रस्त्यावर हॉटेल चालकांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे अनेकदा अपघात होत असतात.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बाबरगाव येथील रहिवासी वैजनाथ सावंत हे पिक अप गाडीने नाशिक येथुन बाभुळगावाला जाताना चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यांनी आपली पिक अप गाडी (एमएच २० ईजी ६९७३) हॉटेलसमोर उभी केली होती‌. त्याचवेळी गंगापूर रस्त्याने येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने (एमएच १५ एचएच ३५५३) औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या रंगाच्या ट्रकला (एम एच ०४ एफजे ८४१५) जोराची धडक दिली. त्यानंतर हा ट्रक घसरत येऊन पिक अप गाडीवर उलटला. त्यामुळे पिक अप गाडी दबुन गाडीचे मोठे नुकसान झाले. तसेच ट्रकचालक राजु शहा हा जखमी झाला. या अपघातात ट्रकमधील रंगाच्या टाक्या अस्ताव्यस्त झाल्याने रस्त्यावर लाल रंगाचा सडा पडल्याचं दिसुन आलं.

हे वाचलं का?

शर्यतीदरम्यान बैलगाडी घुसली प्रेक्षकांमध्ये, तिघे जखमी; थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्याचे एपीआय सुदाम भागवत यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. याप्रकरणी वैजीनाथ सावंत यांनी फिर्याद दिल्यानंतर ट्रकचालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असुन पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय खोकड करीत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT