सरसंघचालकांना कोरोना, अमोल मिटकरी म्हणतात आता भिडे गुरुजींची प्रतिक्रिया विचारा
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले आहेत. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोहन भागवत यांना कोरोना झाला आहे आता संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया विचारा असं म्हणत उपरोधिक टोलेबाजी केली आहे. पत्रकार बांधवांनी आता संभाजी भिडे यांना प्रतिक्रिया विचारावी असं ट्विटच अमोल […]
ADVERTISEMENT
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले आहेत. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मोहन भागवत यांना कोरोना झाला आहे आता संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया विचारा असं म्हणत उपरोधिक टोलेबाजी केली आहे. पत्रकार बांधवांनी आता संभाजी भिडे यांना प्रतिक्रिया विचारावी असं ट्विटच अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
कृपया पत्रकार बांधवानी यावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया एकदा घ्यावी!!@TV9Marathi@abpmajhatv@saamTVnews pic.twitter.com/3MTQjZfL4h
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 10, 2021
सरसंघचालक मोहन भागवत कोरोना पॉझिटिव्ह, नागपूरच्या रूग्णालयात उपचार सुरु
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
हे वाचलं का?
‘कोरोना हा रोगच नाही, तो गां&%$ प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे. तसेच लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही.’ असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. सांगली येथे लॉकडाऊनच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या मोर्च्यावेळी भिडे यांनी हे वक्तव्य केलं होतं.
याच वक्तव्याचा आधार घेऊन अमोल मिटकरी यांनी मोहन भागवत यांना कोरोना झाल्याच्या बातमीची खिल्ली उडवत यावर आता संभाजी भिडेंना प्रतिक्रिया विचारा असं उपरोधिकपणे म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
‘कोरोना गां&%$ प्रवृत्तीच्या लोकांना होणारा रोग’, संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले होते भिडे?
‘कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकानं उघडी त्याला परवानगी आणि कुठे काही रस्त्यावर विकतोय त्याला पोलीस काठ्या मारतायेत. काय चावटपणा चाललाय? महानालायकपणा आहे. लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असलं हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही. मी काही राजकीय माणूस नाही. पण माझ्यासारखे असंख्य लोक अस्वस्थ आहेत देशामध्ये. हा मूर्खपणा चालला आहे. कोरोना हा रोगच नाहीए. हा गां&%$ वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. काही-काही होत नाही.’
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यावरून शिवसेनेच्या सामनातूनही त्यांचा समाचार घेण्यात आला.
काय उल्लेख आहे सामनामध्ये?
संभाजी भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना गां^&** असे म्हटले. त्याऐवजी लसीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना फटकारले असते तर शिवरायांचे नाव राहिले असते. हे राज्य मर्दांचेच आहे हे भिडे किंवा भाजप पुढाऱ्याना माहित नाही का? भिडे गुरूजी संघ विचारांचे कडवट प्रचारक आहेत. ते छत्रपतींचे भक्त आहेत. मास्क लावू नका वगैरे असेही विचार त्यांनी मांडले. आता देशाचे पंतप्रधान काय करणार? आज प्रभू श्रीराम, विष्णू इतकेच काय छत्रपती शिवराय असते तरीही त्यांना मास्क लावूनच सिंहासानावर बसावे लागले असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT