अँटेलिया कार प्रकरण भोवलं, Sachin Vaze पोलीस दलातून निलंबित
मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. अतिरिक्त आयुक्त (स्पेशल ब्रांच) यांच्या आदेशानुसार एपीआय सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे. एनआयएने अँटेलिया संशयित कारमधील जिलेटीन कांड्यांप्रकरणी सचिन वाझेंना अटक केली आहे. त्याच अटकेनंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया […]
ADVERTISEMENT
मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. अतिरिक्त आयुक्त (स्पेशल ब्रांच) यांच्या आदेशानुसार एपीआय सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे. एनआयएने अँटेलिया संशयित कारमधील जिलेटीन कांड्यांप्रकरणी सचिन वाझेंना अटक केली आहे. त्याच अटकेनंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. सुरूवातीला ही कार कुणाची आहे? ही कार कुणी ठेवली? या सगळ्याची उकल झाली नव्हती. मात्र, विरोधी पक्षाने सभागृहात हे प्रकरण उचलून धरलं तेव्हा याबाबत एक-एक गोष्टी समोर आल्या.
‘याच’ CCTV फुटेजनंतर NIA ने केली सचिन वाझेंना अटक, पाहा नवं फुटेज
हे वाचलं का?
त्यातच अँटेलियाबाहेरली स्कॉर्पिओ कार ही मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचंही समोर आलं होतं. पण ५ मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुब्र्याजवळील खाडीत आढळून आला होता. याच प्रकरणी पहिल्यांदा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं. अखेर संपूर्ण प्रकरणी सचिन वाझे हे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले होते.
याप्रकरणी मनसुख हिरेनची पत्नी विमला हिरेन यांनी वाझेंवर आपल्या पतीच्या हत्येचा संशय व्यक्त केला. तसंच असाही दावा केला की, त्यांची स्कॉर्पिओ कार ही नोव्हेंबर 2020 ते 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाझे यांच्याकडेच होती. सध्या मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एटीएस तपास करत आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, वाझे हे (13 मार्च) सकाळी एनआयए कार्यालयात 11 वाजता पोहचले होते. त्यानंतर एटीएस आणि क्राईम ब्रांचचे काही अधिकारी देखील तिथे पोहचले होते. यावेळी एनआयएकडून सचिन वाझे यांना याप्रकरणी बरेच प्रश्न विचारण्यात आले. अखेर 13 तासाच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी संशयित कार सापडली होती त्याप्रकरणी वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी एनआयएकडून अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
PPE KIT घातलेला संशयित कोण? याचीही NIA कडून चौकशी सुरू
वाझेंच्या अटकेनंतर NIA ला सापडली पांढरी इनोव्हा कार
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अवघ्या काही तासात NIA ला एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही सापडली होती. जी 14 मार्चला पहाटे एनआयए कार्यालयात आणली गेली. अँटेलियाबाहेर पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ मागे जी इनोव्हा कार होती ती हिच आहे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एनआयएचे अधिकारी आता तपास करत आहेत.
दरम्यान, यामधील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी इनोव्हा कार एनआयएला सापडली आहे ती कार सचिन वाझे हे सीआययूमध्ये असताना वापरत असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT