NIAच्या चौकशीला जाताना सचिन वाझेंनी का नेला नव्हता मोबाईल?

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. NIA कोर्टाने वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA च्या कस्टडीत ठेवलं आहे. दरम्यान, वाझेंना नेमकी अटक का करण्यात आली याबाबतची एक नवी माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

NIA ने बोलवलेल्या चौकशीला सामोरं जात असताना वाझेंनी आपला मोबाइल सोबत आणला नव्हता. अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी कोर्टात दिली होती. आता या सगळ्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. दुसरीकडे वाझेंना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हणत त्यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात habeas corpus याचिका दाखल केली आहे.

“ठाकरेंना वसुलीसाठी माणूस हवा होता, म्हणून वाझेंना पुन्हा संधी”

हे वाचलं का?

दरम्यान NIA कोर्टातही सुनावणीदरम्यान सचिन वाझे यांची अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकीलांनी केला. सुदीप पासबोला यांनी वाझे यांची बाजू मांडताना, अटकेच्या वेळी वाझेंना वकीलांशी बोलू दिलं नाही. याचसोबत त्यांना त्यांच्या परिवाराशीही बोलू दिलं नाही.

शनिवारी सकाळी वाझे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं…ज्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली. १०-१२ तास वाझेंना बेकायदेशीररित्या कस्टडीत ठेवण्यात आल्याचा युक्तीवाद पासबोला यांनी केला.

ADVERTISEMENT

राजीनाम्याचा प्रश्नच नाही, गृहमंत्री चांगलं काम करतायत- जयंत पाटील

ADVERTISEMENT

वाझेंच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादाला NIA चे विशेष सरकारी वकील सुनिल गोन्झालवीस यांनी, “वाझे चौकशीला आले तेव्हा फोन घेऊन आले नव्हते. संशयित म्हणून वाझेंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं. ते या प्रकरणाचा तपास आधीपासून करत होते. पण चौकशीदरम्यान वाझे सहकार्य करत नव्हते. त्यांनी आपल्या परिवाराचा फोन नंबर दिला नाही. म्हणून त्यांच्या अटकेविषयी त्यांच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली”, असं सांगितलं.

सुनावणीदरम्यान वाझे यांचे वकील पासबोला यांनी वाझे यांची चौकशी झाली तिकडे CCTV कॅमेरा नसल्याकडे कोर्टाचं लक्ष वेधलं. ज्यावर NIA चे वकील मंगळवारी आपली बाजू मांडणार आहेत. वाझे यांची चौकशी NIA चे SP यांच्या केबिनमध्ये झाली.

वाझेंना अटक करण्याच्या आधी तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. NIA च्या Interrogation Room मध्ये कॅमेरा असल्याचंही NIA च्या वकीलांनी सांगितलं.

यादरम्यान NIA च्या SP नी चौकशीदरम्यानची माहिती दिली. “अंबानीच्या घरासमोर सापडलेल्या गाडीतील स्फोटकांचा तपास वाझे करत होते म्हणून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. या प्रकरणाच्या केस डायरी तपासत असताना त्यात काही विसंगती आढळून आल्या. याच कारणासाठी वाझे यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्यांनी जाहीर केलेल्या मेमोमध्येही अनेक चुका होत्या.” या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

सचिन वाझेंनी IPL बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितली – नितेश राणे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT