सांगली : रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक
सांगलीत रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजर करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींपैकी एक आरोपी मिरज येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारक तर दुसरा आरोपी खासगी लॅबमध्ये असिस्टंट म्हणून कार्यरत होता. सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून आरोपींच्या ताब्यात असलेली इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. सुमीत हुपरीकर आणि दाविद वाघमोरे अशी अटकेत असलेल्या […]
ADVERTISEMENT
सांगलीत रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजर करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपींपैकी एक आरोपी मिरज येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये अधिपरिचारक तर दुसरा आरोपी खासगी लॅबमध्ये असिस्टंट म्हणून कार्यरत होता. सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून आरोपींच्या ताब्यात असलेली इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत.
ADVERTISEMENT
सुमीत हुपरीकर आणि दाविद वाघमोरे अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. यापैकी सुमीत हा सिव्हील हॉस्पिटलमध्ये परिचारक तर दाविद खासगी लॅबमध्ये कामाला होता. या दोघांनीही याआधी अशाच प्रकारे इंजेक्शन चोरून बाहेर विकल्याचं तपासात पुढे आलंय. दोन इंजेक्शनसाठी हे आरोपी ६० हजार रुपये घेत होते. मिरज येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी आलेल्या इंजेक्शनमधली काही इंजेक्शन हे आरोपी चोरी करुन बाहेर विकत होते.
Free Corona Vaccination: महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठी बातमी, 18 ते 45 वयोगटातील सर्वांना सरकार देणार मोफत लस!
हे वाचलं का?
सांगली पोलिसांना या बद्दल माहिती मिळाली होती, यावरुन सापळा रचत गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना इंजेक्शन विकताना रंगेहाथ पकडलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT