संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर शिवसेनेतूनच दबाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संजय राठोड यांचा राजीनामा घेणं ही आता उद्धव ठाकरेंची अपरिहार्यता ठरणार का? असा प्रश्न चर्चिला जातो आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर असलेला पक्षांतर्गत दबाव. संजय राठोड यांच्या विरोधात आता शिवसेनेतला एक गटही सक्रिय झाला आहे. या गटाने उद्धव ठाकरेंकडे संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

पाहा याच विषयावरची सविस्तर चर्चा-

पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर बारा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिप्समधला एक आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप करत भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी ९ फेब्रुवारीपासून लावून धरली आहे. त्यापाठोपाठ आता शिवसेनेतूनही संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढतो आहे.

हे वाचलं का?

जुनं पत्रही होतंय व्हायरल

ADVERTISEMENT

या प्रकरणी खासदार प्रताप जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं एक पत्रही व्हायरल होतं आहे. या पत्रात एक महत्त्वाचा उल्लेख आहे. तो असा आहे की, २०१४ च्या मंत्रिमंडळात पश्चिम विदर्भातील विधानसभा सदस्य संजय राठोड यांचा समावेश होता. मात्र मंत्री महोदयांकडून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची कामे होत नसल्याच्या तक्रारी अनेकवेळा करण्यात आल्या. मागील पाच वर्षात कोणतेही काम करण्यात आले नाही. पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम व बुलढाणा या जिल्ह्यांनी पक्षाला नेहमी साथ दिली आहे. तरीही आपल्या नेतृत्त्वात तयार झालेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. पश्चिम विदर्भाला मंत्रीपद द्या अशी मागणी करणारं हे पत्र आहे यामध्ये संजय राठोड यांच्याविषयी थेट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

या पत्रावर कुणाच्या सह्या आहेत?

प्रतापराव जाधव, भावना गवळी, गोपीकिशन बाजोरिया, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, सुरेश मापारी, संतोष ढवळे, शांताराम दाने, शशिकांत खेडेकर, जालिंदर बुधवत, राजेश वानखेडे

काय आहे प्रकरण?

पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने पुण्यात आत्महत्या केली. ७ फेब्रुवारीला ही घटना घडली. त्यानंतर दोन दिवसात १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या व्हायरल क्लिप्समधला एक आवाज हा संजय राठोड यांचा असून त्यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी भाजपने सुरू केली. संजय राठोड हे या प्रकरणापासून नॉट रिचेबल होते. २३ फेब्रुवारीला ते पोहरादेवी या ठिकाणी पोहचले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो समर्थकही त्या ठिकाणी आले होते. यामुळे कोरोना प्रतिबंधाचे नियमही डावलले गेले. त्यावरूनही विरोधकांनी संजय राठोड यांच्यावर टीका केली.

पोहरादेवीच्या घटनेनंतर काय घडलं?

संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली. त्याचवेळी या प्रकरणावरून माझी आणि माझ्या बंजारा समाजाची बदनामी सुरू आहे असंही वक्तव्य केलं. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेटही घेतली. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. मात्र संजय राठोड यांना अभय मिळालं.

भातखळकर म्हणतात अधिवेशन होऊ देणार नाही

संजय राठोड यांचा राजीनामा जोपर्यंत ठाकरे सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

भाजपच्या चित्रा वाघ आक्रमक

दोन दिवस झालेल्या या घडामोडींनंतरही संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला नाही. त्यामुळे २५ फेब्रुवारीला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक होत संजय राठोड यांच्यावर पुन्हा आरोप केले. संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशीही मागणी केली. पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणावर पुणे पोलीस शांत का आहेत? गुन्हाही का नोंदवण्यात आलेला नाही? हे आणि असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम असतानाच आता शिवसेनेतल्या एका गटाकडून दबाव वाढतो आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी संजय राठोड विरोधी गटाने केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT