संजय राऊतांचा संताप! नुपूर शर्मांचा उल्लेख, संभाजी भिडे, शिंदे-फडणवीसांसह विरोध पक्षांनाही सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांवरील वाद सुरूच आहे. विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात असतानाच संजय राऊतांनी या मुद्द्यावरून रोखठोक सदरातून विरोधी पक्षानाच खडेबोल सुनावले आहेत.

ADVERTISEMENT

संजय राऊतांनी रोखठोक मध्ये लिहिलेल्या लेखात नुपूर शर्मांबद्दल घेतलेल्या भूमिकेची आठवण भाजपला करून दिली आहे. त्याचबरोबर संभाजी भिडेंनाही मागच्यावेळी घेतलेल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी आरसा दाखवला आहे.

संजय राऊत म्हणतात, ‘वीर सावरकरांच्या अपमान प्रकरणात भाजपने जो जोश व जोर दाखवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रकरणात दाखवला नाही. उलट छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचे समर्थन केले. ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय?’ असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

‘इकडे राज्यपाल शिवराय जुनेपुराणे झाले असे म्हणतात तर तिकडे भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी राजांनी औरंगजेबास तडजोडीसाठी पाच पत्रे पाठवली म्हणजे माफीच मागितल्याचा स्फोट करून महाराष्ट्राची मने दुखावली आहेत. या दोन लोकांनी शिवाजी राजांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे सरकार तोंड शिवून बसले. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपमानाच्या विरोधात साधा निषेध केला नाही. उलट राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा बचाव केला. असे आक्रित इंग्रजकाळातही घडले नव्हते’, अशा शब्दात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण डागले आहेत.

‘दोन महिन्यांनंतर सत्ता योग नाही’, संजय राऊतांनी काढली एकनाथ शिंदेंची कुंडली

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांची निंदा राजद्रोहच -संजय राऊत

संजय राऊत लेखात पुढे म्हणतात, ‘राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, ही मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. अशा राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे हा राजद्रोहासारखा गुन्हा आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांची केलेली निंदा हा जर राजद्रोहासारखा गुन्हा ठरत असेल तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची निंदा हा राजद्रोहच म्हणायला हवा.’

ADVERTISEMENT

संजय राऊत रोखठोक : नुपूर शर्मा प्रकरणाची भाजपला करून दिली आठवण, संभाजी भिडेंनाही सुनावलं

संजय राऊत यांनी नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानानंतर भाजपनं घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख केलाय. त्याचबरोबर संभाजी भिडे यांनाही त्यांनी यापूर्वी घेतलेल्या भूमिकेचं स्मरण करून दिलंय. ‘मागे एका प्रकरणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान झाला म्हणून संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना ‘सांगली बंद’ केले, पण आज छत्रपती शिवरायांचा भाजपकृत अपमान होऊनही ते गप्प आहेत. या प्रश्नी सर्व शिवप्रेमी संस्था व संघटनांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र बंद’चीच हाक द्यायला हवी’, असं म्हणत राऊतांनी संभाजी भिडेंनाही लक्ष्य केलंय.

शिंदे गुवाहटीला तर ठाकरे शेतकऱ्यांमध्ये : राऊतांनी केली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची तुलना

रोखठोकमध्ये संजय राऊत म्हणतात, ‘प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावर इस्लामी व अरब राष्ट्रांनी निषेध करताच भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचे मात्र समर्थन केले जाते! बदनामी करणाऱ्यांचा केसही वाकडा झाला नाही. ते त्यांच्या पक्षात आणि पदावर कायम आहेत’, अशी भूमिका मांडत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT