राम मंदिराच्या बदल्यात सरन्यायाधीशांना खासदार केलं गेलं; संजय राऊतांचं खळबळजनक विधान
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील मोदी सरकार आणि भाजपवर केलेल्या टीकेनंतर विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर पलटवार केला. बाबरी मशीद, अयोध्येतील राम मंदिर आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांकडून करण्यात आलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्णयासाठी तत्कालीन सरन्यायाधीशांना खासदारकी देण्यात आल्याचं विधान केलं. माध्यमांशी बोलताना […]
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील मोदी सरकार आणि भाजपवर केलेल्या टीकेनंतर विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर पलटवार केला. बाबरी मशीद, अयोध्येतील राम मंदिर आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांकडून करण्यात आलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्णयासाठी तत्कालीन सरन्यायाधीशांना खासदारकी देण्यात आल्याचं विधान केलं.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘शिवसेनेचा जन्म हा १९६९ सालातला. शिवसेनेचा मुंबईतील पहिला महापौर आणि त्यावेळी किती नगरसेवक निवडून आले होते, याबद्दलच एक शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ठेवू. ज्यांना याचचं त्यांनी यावं. भाजपच्या जन्माच्या आधी शिवसेनेचे आमदार निवडून आलेत. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईशी संबंध नसेल. महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल. कारण या सगळ्या गोष्टी फडणवीसांच्या जन्माच्या आधीच्या आहेत’, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला.
राम जन्मभूमी आंदोलनात शिवसेनेचा संबंध नव्हता, असा दावा भाजपकडून करण्यात आला. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘इतिहास आहे. दस्ताऐवज आहे. नोंदणी आहे. सीबीआय न्यायालयासमोर जे साक्षीपुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. लालकृष्ण आडवाणींबरोबर बाळासाहेब ठाकरेंना आरोपी करण्यात आलं. ते न्यायालय मुर्ख होतं का?’, असा सवाल राऊतांनी केला.
हे वाचलं का?
‘कारसेवक का एका पक्षाचे होते का? मुंबईतून शेकडो कारसेवक गेले. त्यात अनेक प्रमुख लोक आमचे होते. सेना भवनात त्यावेळी वॉर रुम होती. त्यामुळे अशी कितीही माहिती प्रसवली, तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. अयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचं योगदान हे एक ऐतिहासिक कार्य आहे. जेव्हा राम जन्मभूमीचा लढा थंड पडला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येत गेलो आणि सरकारला जाग आणली. उद्धव ठाकरे तिकडे दोन वेळा गेलो. वारंवार जातो. अयोध्येशी आमचा काय संबंध आहे हे रामाला माहितीये,’ असं राऊत यांनी भाजपला सुनावलं.
राम मंदिर मोदींनी करून दाखवलं, असं विधान फडणवीसांनी केलं होतं. त्यावर राऊत म्हणाले, ‘मोदींनी करून दाखवलं नाही. ते सर्वोच्च न्यायालयाने करून दाखवलं आणि त्याबदल्यात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केलं,’ असं खळबळजनक विधान राऊत यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT