सातारा : ‘आम्ही कधी कुणाची घरं फोडली नाहीत’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार
–इम्तियाज मुजावर, सातारा नारळ फोडी गँग असं म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या टीकेवरून आता उदयनराजे भोसले यांनी पलटवार केला आहे. नारळफोडी गँग म्हटलं जातंय. हो, आम्ही आहोत आणि सार्थ अभिमान आहे. कारण आम्ही काम करतो’, असं म्हणत उद्यनराजे भोसले यांनी टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात कास […]
ADVERTISEMENT
–इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
नारळ फोडी गँग असं म्हणत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या टीकेवरून आता उदयनराजे भोसले यांनी पलटवार केला आहे. नारळफोडी गँग म्हटलं जातंय. हो, आम्ही आहोत आणि सार्थ अभिमान आहे. कारण आम्ही काम करतो’, असं म्हणत उद्यनराजे भोसले यांनी टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
साताऱ्यात कास पाईपलाईन उद्घाटन कार्यक्रम खासदार उदयनराजे भोसले यांच्याहस्ते पार पडला. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ‘लहान मुलं परवडली. वय वाढलं पण बुद्धी लहान मुलांपेक्षाही कमी होत गेली. मग नारळ फोडी गँग. हो, सार्थ अभिमान आहे. का? तर आम्ही काम करतो. लोकांच्या हिताची कामं करतो. लोकांनी जो विश्वास आमच्याबद्दल दर्शवलाय, त्याला पात्र राहणं आमचं कर्तव्य आहे. त्याच हिशोबाने आम्ही आजपर्यंत वाटचाल केली आहे”, असं उदयनराजे म्हणाले.
हे वाचलं का?
‘लोटांगण घाला, पण नगरपालिकेला लोळवायची वेळ आनु नका’, शिवेंद्रराजे भोसलेंचं उदयनराजेंना प्रत्युत्तर
“काम केली म्हणून आम्ही नारळ फोडतो. इतक्या वैयक्तिक पातळीवर जाणं मी माझ्या उंचीच्या मानाने मी कमी समजतो. दिशाहीन झालेले, अत्यंत संकुचित वृत्तीचे काही लोक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होतं. ज्यांच्याकडून पूर्तता होईल, अशा लोकांकडून अपेक्षा केल्या जातात. आम्ही नारळ वाढवतो. कामाची नारळ वाढवतो. कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात करताना नारळ वाढवतात. ती पद्धत आहे,” असंही उद्यनराजे म्हणाले.
ADVERTISEMENT
पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले, “आम्ही कधी कुणाची घरं फोडली नाहीत. ज्या विश्वासाने साताऱ्यातील लोकांनी स्वतःच्या आयुष्यातील पूंजी, आयुष्याची कमाई काही लोकांच्या घराण्याकडे बघून विश्वासाने त्यांच्या बँकांमध्ये ठेवली. आज त्या लोकांची काय अवस्था आहे? आम्ही घरफोडी तर केली नाही. आम्ही लोकांचं वाटोळं केलं नाही. बोलत असताना प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. खरंतर मला कीव येते,” असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंह राजे यांना उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
साताऱ्यात दोन राजेंमधला वाद पेटला!
शिवेंद्रसिंह राजे काय म्हणाले होते?
‘जे काम मंजूर होतं त्याचा नारळ फोडायला ही मंडळी पुढं असतात. जस जशा निवडणुका जवळ येतील तसे त्यांचे नारळ फोडण्याचा उपक्रम सुरु होणार आहे. हद्दवाढीचा निर्णय यांच्यामुळेच लांबला, हे सत्य आहे. ज्या मार्गाने पैसे मिळतील, त्या मार्गाने खायचा असे त्यांचे काम सुरु असते. त्यामुळे नारळ फोड्या गॅंगला सातारकर आता नारळ देतील आणि संपुर्ण सातारा विकास आघाडीला घरी बसवेल’, असं शिवेंद्रसिंह राजे म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT