मोठी बातमी! सरकारच्या हाकेला सात कंपन्यांचा प्रतिसाद, रेमडेसिवीरच्या दरात केली कपात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे रेमडेसिवीरवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये राजकारण रंगलं आहे.. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. ती बातमी अशी आहे की रेमडेसिवीर हे इंजेक्शन तयार करणाऱ्या सात कंपन्यांनी सरकारच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या दरांमध्ये कपात केली आहे.

ADVERTISEMENT

या सात कंपन्या कोणत्या आहेत आणि त्यांचे आधीचे आणि आत्ताचे दर काय आहेत जाणून घेऊ..

कॅडिला हेल्थ केअर ही कंपनी रेमडॅक या ब्रांडचं इंजेक्शन तयार करते या एका इंजेक्शनची किंमत आधी 2800 रूपये होती जी आता कपातीनंतर 899 रूपये करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

सेनजिन इंटरनॅशन (बायकॉन बायोलॉजिक्स इंडिया) या कंपनीचं रेमविन या ब्रांडने मिळणारं इंजेक्शन 3950 रूपयांना मिळत होतं, कपातीनंतर त्याची किंमत 2450 रूपये करण्यात आली आहे.

डॉ. रेड्डीज लॅबरोटरीज लिमिटेड ही कंपनी रेडवाएक्स या ब्रांडने मिळणारं इंजेक्शन 5400 रूपयाने मिळत होतं जे आता कपातीनंतर 2700 रूपयांना मिळू शकणार आहे.

ADVERTISEMENT

सिपला ही कंपनी सिपरेमी या ब्रांडनेमने इंजेक्शन तयार करते ज्याची किंमत 4000 रूपये होती. कपातीनंतर ही किंमत आता 3000 रूपये इतकी असणार आहे.

ADVERTISEMENT

मायलन फार्मास्युटीकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी डेसरेम या ब्रांडनेमने इंजेक्शन तयार करते ज्याची किंमत 4800 रूपये इतकी होती कपातीनंतर या इंजेक्शनची किंमत आता 3400 रूपये इतकी झाली आहे.

ज्युबिलंट जेनरिक्स लिमिटेड ही कंपनी ज्युबी आर या ब्रांडनेमने इंजेक्शन तयार करते या इंजेक्शनची किंमत 4700 रूपये होती जी आता कपातीनंतर 3400 रूपये झाली आहे.

हेटरो हेल्थकेअर्स लिमिटेड ही कंपनी कोव्हिफोर या नावाने इंजेक्शन तयार करते हे इंजेक्शन बाजारात आधी 5400 रूपयांना मिळत होतं जे कपातीनंतर 3490 रूपयांना मिळू शकणार आहे.

रेमडेसिवीर या इंजेक्शन्सचं उत्पादन वाढवण्यात यावं आणि त्याच्या किंमती कमी करण्यात याव्यात जेणेकरून या इंजेक्शन्सचा तुटवडा भासणार नाही आणि सामान्यांच्या आवाक्यात या इंजेक्शन्सच्या किंमती येतील असं आवाहन हे राज्य सरकारने कंपन्यांना केलं होतं. रेमडेसिवीर हे इंजेक्शन विविध ब्रांडनेमने तयार करणाऱ्या सात कंपन्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या सातही कंपन्यांनी इंजेक्शनचे दर कमी केले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT