पालघरचे सात खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात, चिंताक्रांत कुटुंबांना सरकारच्या मदतीची अपेक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मोहम्मद हुसैन खान, प्रतिनिधी पालघर

ADVERTISEMENT

गुजरात मधील ओखा बंदरातील मासेमारी करणाऱ्या दोन बोटींसह १६ खलाशांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल असून यातील सात खलाशी हे पालघर जिल्ह्यातील आहेत . कुटुंबातील कर्ता पुरुषच पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात गेल्याने ही कुटुंब सध्या चिंतेत असून मायबाप सरकारकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत .

हे वाचलं का?

डहाणूतल्या अस्वली गावातल्या सहा तर सोगवेतल्या एकाला पाकिस्तानने घेतलं ताब्यात

डहाणूतील अस्वाली गावातील सहा तर सोगवे येथील एका खलाशाला पाकिस्तान सैन्याने ताब्यात घेतल आहे . रोजगारासाठी ओखा येथे मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या या कामगारांना समुद्रातूनच पाकिस्तानच्या मेरिटाईम विभागाने ताब्यात घेतलं . त्यामुळे या खलशांची कुटुंबं सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहेत . कुटुंबातील कमावता कर्ता पुरुषच पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याने ही कुटुंब सध्या मरणयातना सोसत आहेत .

कुटुंबाचा प्रमुखच पाकिस्तानच्या ताब्यात, कुटुंबांच्या पायाखालची जमीन सरकली

कुटुंबाची घडी चालवणारा कुटुंबप्रमुख पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याच ऐकताच या कुटुंबांच्या पाया खालची जमीन सरकली . घराची आर्थिक घडी चालवणारा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असल्याने घर खर्च आणि मुलांचा खर्च करायचा कसा असा गंभीर प्रश्न या महिलांसमोर उभा राहिलाय . तर कृष्णा बूजड हा घरातील एकटा करता पुरुष आता पाकिस्तान च्या ताब्यात असल्याने घरात अपंग आई आजी ,पत्नी आणि मूल असा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न कृष्णा च्या कुटुंबीयांना पाडला आहे.

ADVERTISEMENT

सात खलाशी मासेमारीसाठी गेले होते ओखा या ठिकाणी

नवश्या भीमरा , विजय नागवंशी , सरीत उंबरसाडा , जयराम साळकर , कृष्णा बुजड , विनोद कोल , उधऱ्या पाडवी अशी या सात खलाशींची नावं असून महिनाभरापूर्वीच हे ओखा बंदरातील एका मासेमारी बोटीवर रोजगारासाठी गेले होते . पालघर मधील डहाणू , तलासरी , विक्रमगड या दुर्गम भागातील शेकडो कामगार स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने गुजरात कडे धाव घेतात . यातील अनेक कामगार हे आजही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत . यात असलेला धोका लक्षात येऊनही रोजगारासाठी येथील अनेक कुटुंब प्रमुख मासेमारीसाठी बोटींवर खलाशी म्हणून जातात . त्यामुळे सरकारने आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या खलासांची सुटका करून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT