कल्याणमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; हॉटेलमधून तीन मुलींची सुटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे मानव तस्कर विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कल्याणमध्ये सुरू असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या पथकाने तीन मुलींची सुटका करत त्यांच्याकडून जबरदस्ती देहविक्री करून घेणाऱ्या एका दलाल महिलेला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

कल्याणामधील एका हॉटेलमधून एका महिला दलाला पोलिसांनी अटक केली असून, तीन मुलींची सुटका केली आहे. ही महिला कल्याण उल्हासनगर परिसरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासातून समोर आलं आहे.

हे वाचलं का?

ठाणे अनैतिक मानव तस्कर विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना एक महिला दलाल मुलींकडून जबरदस्तीने देहविक्री करवून घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिडन्सी नजीक काही मुलींना घेवून येणार असल्याचीही माहिती मिळाली होती.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ-बहिणीला चाकूचा धाक दाखवून लुटलं, आरोपी अटकेत

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने सापळा रचला. महिला दलालाकडे एक बोगस ग्राहक पाठवला आणि सत्यता पटताच त्या महिलेला ताब्यात घेतलं. त्यानंतर महिलेच्या ताब्यातील तीन मुलींची सुटका केली.

ADVERTISEMENT

कल्याण : आई-मुलीला बेदम मारहाण, घरातील दागिने आणि रोकड घेऊन चोरटे पसार

या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, या महिला दलालाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. तसेच तीन मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT