शाहरुखच्या गैरहजेरीत आर्यन खान आयपीएल लिलावात; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ड्रग्ज प्रकरणामुळे वादात अडकलेल्या आणि जामीन मिळाल्यापासून एकांतात असलेला आर्यन खानचं नाव अचानक सोशल मीडियावर ट्रेंडिगमध्ये आलं. निमित्त होत आयपीएल लिलावाचं. आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी लिलाव सुरू असून, या लिलावात शाहरूख खानऐवजी आर्यन खान आणि सुहाना खान सहभागी झाले आहेत. शाहरूखच्या चाहत्यांकडून ट्विटरवर आर्यन खानचे फोटो ट्वीट केले आहे.

ADVERTISEMENT

आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी लिलाव सुरू असून, आयपीएलमधील सर्वच संघांकडून खेळाडू खरेदी केले जात आहे. मात्र, यावेळी केकेआरचा मालक शाहरुख खान लिलावाला अनुपस्थित आहे. शाहरुखच्या ऐवजी आर्यन खान आणि सुहाना खान आयपीएल लिलावात सहभागी झाले आहेत.

बऱ्याच दिवसांनंतर आर्यन खान सार्वजनिक जीवनात दिसला असून, बहीण सुहाना खानसोबत तो ऑक्शन ब्रीफिंगच्या ठिकाणी दिसून आला. केकेआर व्यवस्थापनासोबतचे त्यांचे फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हे वाचलं का?

ड्रग्ज प्रकरणात तुरूंगातून सुटल्यानंतर आर्यन खानने पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

यूजर्संनी आर्यन खानचे लिलावादरम्यानचे फोटो ट्वीट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT