Sharad Pawar आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तब्बल 19 महिन्यांनी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यानंतर आता महाराष्ट्र सरकारचं काय होणार? अशीही चर्चा रंगली आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही एकत्र येऊ शकत नाही असं सांगितलं. आता यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले संजय राऊत?

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीबाबत आश्चर्य वाटावं, धक्कादायक असं काय आहे? शरद पवार हे देशाचे माजी कृषीमंत्री, संरक्षणमंत्री आहेत. सहाकार क्षेत्रातील दिग्गज असं ते नेतृत्व आहे. अशा एखाद्या प्रश्नासाठी शरद पवार हे त्यांना भेटले असतील. मलाही कल्पना होती, आम्हाला सगळ्यांना कल्पना होती की सध्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्रात जे सुरू आहे.

हे वाचलं का?

काही सूडाच्या कारवाया त्या संदर्भात लवकरच शरद पवार हे पंतप्रधान मोदींना भेटून जी काही तथ्य आहेत, या क्षेत्रातील त्या सांगण्याची शक्यता आहे असं मलाही वाटत होतं आणि त्यांनी सांगणं गरजेचं सुद्धा होतं. आता नक्की त्यासाठीच भेट घेतली का हे शरद पवारच सांगू शकतील. पण शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत. आता खासदार जाऊन पंतप्रधांनाना भेटू शकत नाही का? आमदार भेटतात मुख्यमंत्र्यांना, नगरसेवक भेटतात महापौरांना, आम्ही खासदार पंतप्रधानांना भेटतो, केंद्रीय मंत्र्यांना भेटतो. शरद पवार हे टोलेजंग नेते आहेत.’

NCP आणि BJP कधीही एकत्र येणार नाहीत-नवाब मलिक

ADVERTISEMENT

‘या भेटीबाबात विश्वासात घेण्याचा प्रश्न येतो कुठे? संसद सदस्य पंतप्रधानाना भेटू शकत नाही का? आम्ही भेटतो ना, सध्या भारतात मीडियाचे काही प्रश्न आहेत. आता अनेकांचं असं मागणं आहे की, एक शिष्टमंडळ जाऊन आपण पंतप्रधानांना भेटूयात. मी पण वेळ मागितील आहे त्यांची मीडियाच्या काही विषया संदर्भात.

ADVERTISEMENT

पंतप्रधानांना भेटून आपले प्रश्न मांडणं हे आमचं काम आहे. शरद पवार नक्कीच एक राजकारणातले, सहकार, कृषी क्षेत्रातील महत्वाचे नेते आहेत आणि पंतप्रधान व शरद पवार यांचे संबंध हे काय आजचे नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जसं उद्धव ठाकरे व पंतप्रधान मोदी यांचे संबंध आजचे आहेत का? नाही ते जुने आहेत. तसेच शरद पवार व पंतप्रधान मोदी यांचे संबंध फार जुने आहेत. या भेटींवरून होणाऱ्या राजकीय चर्चांना काही अर्थ नाही. या सर्व निरर्थक चर्चा आहेत. शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली किंवा उद्धव ठाकरे व मोदींची भेट झाली तर त्याचे परिणाम राज्यातील सरकारवर होणार नाही.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT