साताऱ्यात शरद पवारांचा नवा डाव: सातारा बँक अध्यक्षपदासाठी BJPच्या शिवेंद्रसिंहराजेंच्या नावाला हिरवा कंदील?

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: येत्या 6 डिसेंबरला सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड आहे. या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जावळीचे भाजपचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना अध्यक्षपद  मिळावे यासाठी सातारा जिल्ह्यातून शरद पवार आणि अजित पवार  यांच्याकडे  जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. यासाठी दस्तुरखुद्द शिवेंद्रसिंहराजे भोसले मुंबईला शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. 

ADVERTISEMENT

दरम्यान, या भेटीनंतर  सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात बँकेचा अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. दरम्यान भेटीप्रसंगी शरद पवारांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

अजित पवार यांनी देखील  शिवेंद्रराजे यांच्या बँकेच्या कार्यप्रणालीचे यापूर्वीदेखील कौतुक केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीला ग्रीन सिग्नल दिला असल्याचे देखील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

हे वाचलं का?

थोरले पवार आणि धाकले पवार यांच्या मर्जीतील असणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार असाच सूर देखील राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे. 

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरुन सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांत रस्सीखेच सुरु आहे. त्यातच मागील वेळी बॅंक चांगल्या प्रकारे चालवणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

ADVERTISEMENT

तसेच मागील पंचवार्षिकमध्ये सर्वांना बरोबर घेऊन बॅंक चालवली आहे. त्यामुळे यावेळेस पुन्हा अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी शरद पवार यांच्यापुढे मांडली.

ADVERTISEMENT

यासंदर्भात आपण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलतो, असा शब्द पवारांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचाही हात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या खांद्यावर असल्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ शिवेंद्रराजे यांच्याच गळ्यात पडणार हे मात्र निश्चित मानले जात आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्ष पदावर संधी मिळावी म्हणून काही संचालकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

यामध्ये वाईचे नेते नितीन लक्ष्मणराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे हेही इच्छुकांच्या रेसमध्ये आहेत. त्यासोबतच विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही इच्छुक आहेत.

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर जिल्हा बँकेचा कार्यभार गौरवला गेला आहे आणि नाबार्डच्या इतिहासात प्रथमच देशात जिल्हा बँक दर्जेदार बँक म्हणून किताब मिळवला आहे.

मागील पाच वर्षे सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळावी, अशी त्यांचीही अपेक्षा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुंबईत ठाण मांडून आहेत. काहींनी शरद पवार यांची भेट घेऊन आगामी नगरपंचायत, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबतही चर्चा केली.

जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती व आगामी निवडणुकीत कोणती रणनिती वापरायची याविषयी चर्चा करुन सल्ला घेतला आहे.

तसेच आज दुपारी दोन, अडीचच्या सुमारास सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत बॅंकेचे संचालक अनिल देसाई उपस्थित होते.

यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मी बॅंकेच्या अध्यक्ष पदावर आगामी काळातही काम करण्यास इच्छुक असून मागील वेळी सर्वांना सोबत घेऊन बॅंकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने केले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी अजित पवार यांनी यासंदर्भात मी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलून ठरवतो. असे सांगितले आहे. तसेच बॅंक आगामी काळात चांगल्या प्रकारे चालवा, केवळ कारखान्यांनाच कर्ज देऊन बॅंक मोठी होणार नाही. इतर संस्थांनाही कर्ज पुरवठा करण्याबाबतचे धोरण घ्यावे.

सातारा: राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही थिरकले!

तसेच आगामी काळातही बॅंक सर्वांनी मिळून एकत्र कामकाज करुन चांगल्या प्रकारे चालवा, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.

अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आतापर्यंत नितीन पाटील उघडपणे पुढे आले होते, आता शिवेंद्रसिंहराजेंनीही पवार यांची भेट घेऊन मागणी केल्याने या पदाच्या निवडीतील चुरस वाढली आहे.

अजित पवार कोणाचे नाव निश्चित करणार की शरद पवारांशी चर्चा करुन राष्ट्रवादीतील एखाद्याचे नाव सुचवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT