Sanjay Raut :”शिवसेना पक्ष हायजॅक करणं शक्य नाही, कुणी तसा प्रयत्नही करू शकत नाही”
शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष आहे. या पक्षासाठी अनेक अनेक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं आहे. घाम गाळला आहे, अशा शिवसेनेला हायजॅक करणं शक्य नाही. कुणी कितीही ठरवलं तरीही शिवसेना हायजॅक करू शकत नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्याने आणि आपल्यासह […]
ADVERTISEMENT

शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष आहे. या पक्षासाठी अनेक अनेक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं आहे. घाम गाळला आहे, अशा शिवसेनेला हायजॅक करणं शक्य नाही. कुणी कितीही ठरवलं तरीही शिवसेना हायजॅक करू शकत नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्याने आणि आपल्यासह ३६ हून अधिक आमदार गुवाहाटीला घेऊन गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. त्यानंतर आता शिवसेना हायजॅक करणं कुणालाही शक्य नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीत आम्ही पक्षाच्या वर्तमानाबाबत आणि भविष्याविषयी चर्चा करू. शिवसेना पक्ष हा खूप मोठा पक्ष आहे. हा पक्ष बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचा आहे. हा पक्ष कुणी ठरवलं तरीही हायजॅक करू शकत नाही. तसा विचारही करूही शकत नाही. पैशांच्या जोरावर कुणीही पक्ष खरेदी करू शकत नाही.
सध्या जे संकट आलं आहे त्याला आम्ही संकट मानत नाही. आम्ही आता पक्ष विस्तार करतो आहोत. आम्ही या सगळ्याकडे संधी म्हणून पाहतो आहोत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आम्ही महत्त्वाचे निर्णय घेणार आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कुणीतरी महाशक्ती म्हणवणारा पक्ष बंडखोरांच्या मागे आहे म्हणून तो पक्ष विकत घेता येणार नाही.
