“आपसातल्या द्वंद्वामुळे शिवसेना फुटली” आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वत:च्या पक्षातील लोक जेलमध्ये आहेत आणि आमच्या युतीच्या पक्षावर हे लोक टीका करत आहेत. त्यामुळे यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. सुशील मोदींनी शिवसेनेचा उल्लेख केला असेल तर त्यात चूक काय आहे? असा प्रश्न विचारत आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसंच शिवसेना आपापसातल्या द्वंद्वामुळे फुटली अशीही टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

‘उद्धव ठाकरे, तुम्ही उलट्या काळजाचे’; सुप्रिया सुळेंचं नाव घेत आशिष शेलारांचं टीकास्त्र

उद्धव ठाकरे आमच्यासोबत २०१९ मध्ये राहिले असते..

आमच्यासोबत जर त्यावेळची उद्धव ठाकरे राहिले असते तर अशाप्रकारचं द्वंद्व पाहायला मिळालं नसतं. उद्धव ठाकरे आमच्यासोबत राहिले असते तर आपापसात द्वंद्व झालं नसतं. एवढंच नाही तर शिवसेनेत बंडही झालंही नसतं असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ फॉर्म्युल्यावरच उद्धव ठाकरे पुन्हा करत आहेत शिवसेनेची उभारणी

आमची वैचारिक लढाई आहे

भाजप प्रदेश कार्यालयात कार्यक्रमानंतर पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, ही वैचारीक लढाई आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार वाढला पाहीजे, यासाठी त्यांना ही भूमिका का घ्यावी लागली? याबाबत त्यांना आत्मचिंतन केलं पाहीजे. आमच्या सोबत जेव्हा उद्धव ठाकरे होते त्यावेळी ते एका विचारधारेबरोबर, हिंदुत्वाबरोबर आणि राष्ट्रहिताबरोबर होते. द्वंद्व निर्माण होण्याची परिस्थिती उद्धव ठाकरेंनी आणली आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार सांभाळणं आणि वाढवणं तसेच त्याला सन्मान देणं ही भूमिका भाजपाने घेतली आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मित्रपक्षाला संपवायचं ही भाजपची रणनिती?

शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांना फार मोठ्या जुन्या गोष्टीची आठवण करून देणं याची आवश्यकता नाही. ज्यांचा जन्म दुसरा पक्ष किंवा त्यावेळचा स्वतःचा पक्ष फोडून केला त्यांनी दुसऱ्या पक्षाबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही. शरद पवार काँग्रेसमध्ये असताना पक्षाच्या नेतृत्वावर टीका करून संपवण्याचं काम कोणी केलं? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने कसं वागलं पाहीजे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे का? हा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचारला पाहिजे. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कुणाला मिळावा याबाबत मत मांडण्याचा संपूर्ण अधिकार शरद पवार यांना आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस इलेक्शन कमिशन नाहीये. त्यांनी त्यांचं मत जरूर मांडावं, पण कायदा कायद्याचं काम करेल.

ADVERTISEMENT

उखाड दिया अशी टीका करणारे आता जेलमध्ये आहेत

ज्यावेळी एखादा पक्ष बळकट होत जातो. त्यावेळी इतर पक्षांची जागी कमी होत जाते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भारतीय जनता पक्षाने कोणताही पक्ष फोडणे किंवा संपवणे, असं धंदे केलेले नाहीयेत. आम्हाला “उखाड दिया” म्हणणारे जेलमध्ये गेले आहेत. संपवण्याची भूमिका कोणी घेतली? त्यांची वाताहात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलणारे ईडी आणि कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. भारतीय जनता पक्षाने हे सर्व आरोप सहन केले आहेत. पण कधीच अशा पद्धतीची भूमिका कधीही मांडली नाही. असा विचारच आम्ही कधी केला नाही. इंडिया म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे इंडिया, असं बोलणाऱ्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असाही टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT