उद्धव ठाकरेंवर ठाण्यातील शिवसैनिक नाराज? कारण ठरले जितेंद्र आव्हाड!
Shiv Sainiks in Thane Displeasure with Uddhav Thackeray?: ठाणे : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एकत्र येत नुकतीच आघाडीची घोषणा केली. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या काही वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना थेट शब्दात (Jitendra […]
ADVERTISEMENT
Shiv Sainiks in Thane Displeasure with Uddhav Thackeray?: ठाणे : शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एकत्र येत नुकतीच आघाडीची घोषणा केली. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या काही वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना थेट शब्दात (Jitendra Awhad) इशारा दिला होता.
ADVERTISEMENT
अशातच गुरुवारी (२६ जानेवारी) उद्धव ठाकरे यांचा सत्तासंघर्षानंतर पहिला ठाण्यातला दौरा झाला. याच दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला ठाण्यात (Thane) जितेंद्र आव्हाड दिसले. इतकंच नाही तर, ठाण्यात ठाकरेंच्या ठरलेल्या संपूर्ण कार्यक्रमात आव्हाड अगदी सावलीसारखे ठाकरेंबरोबर वावरताना दिसले. पण याच गोष्टीमुळे ठाण्यातील शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा आहे. (shivsena chief Uddhav Thackeray first visit to Thane After ShivSena Rebellion but Shiv Sainiks Displeasure )
ठाकरेंच्या कालच्या दौऱ्यात ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन आणि ठाकरेंसोबत राहिलेल्या खासदार राजन विचारे यांना सामर्थ्य देणे हा उद्देश असल्याचं बोललं जात होतं. पण या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेची, ठाण्यातली ठळक ओळख असलेले नेते राजन विचारे यांच्याऐवजी उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांचं एकमेकांबरोबर दिसणं हे ठाण्यातल्या शिवसैनिकांना खटकलं. ठाकरेंच्या शेजारी गाडीत आणि स्टेजवर आव्हाडांचं बसणं, कधी हास्यविनोद करत, तर कधी धीरगंभीरपणे चर्चा करत सुरू असलेला त्यांच्यातला संवाद हा ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना खटकल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
हे वाचलं का?
Uddhav Thackeray: शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंची गर्जना, म्हणाले, लवकरच…
राष्ट्रवादीचे आमदार आणि ठाण्यातले नेते जितेंद्र आव्हाडांनी मुलूंडच्या टोल नाक्यावरच ठाकरेंचं स्वागत केलं आणि त्यांच्या गाडीत बसले. ते थेट ठाकरेंचा दौरा पूर्ण झाल्यानंतरच गाडीतून उतरले. शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्धघटनाच्या स्टेजवरही ठाकरे आणि आव्हाड सोबत होते. आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना, जैन धर्मियांच्या महोत्सवाला हजेरी लावतानाही आव्हाड हे ठाकरेंबरोबरच होते. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे जेव्हा गाडीतून निघाले तेव्हा त्यांच्या शेजारी जितेंद्र आव्हाड आणि ड्रायव्हर सीटवर राजन विचारे होते. त्यानंतर या कार्यक्रमात स्टेजवरही ठाकरे आणि आव्हाड शेजारीच बसलेले दिसले.
ADVERTISEMENT
महत्त्वाचं म्हणजे राजन विचारे सोबत असताना ठाकरे हे आव्हाडांबरोबर असल्याचं दिसण्याची ठाण्यातल्या शिवसैनिकांनी नोंद घेतली आणि ठाण्यातल्या शिवसैनिकांमध्ये याबद्दलची खुसफूस सुरू झाली.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray आनंदाश्रमासमोरुन गेले पण गाडी थांबली नाही… काय घडलं?
26 जानेवारीला जेव्हा ठाकरे ठाण्यात जाणार होते त्यावेळी आव्हाडांकडून आनंद दिघे यांचे फोटो असलेले होर्डिंग्ज ठाण्यात काही ठिकाणी लावले होते. अर्थात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळ लावत आपल्याकडे वळवण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची तयारी सुरू आहे. त्याला उत्तर म्हणून आव्हाडांनी हे फलक लावले होते की ठाकरेंच्या स्वागताच्या निमित्ताने आव्हाडांनी हे फलक लावले होते याबद्दल चर्चा सुरू असतानाच आव्हाड आणि ठाकरे बरोबर दिसल्याने भुवया उंचावल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिलीय.
राष्ट्रवादी सोडून आव्हाड ठाकरे गटात येणार नाही हे राजकीय पटलावरचं स्पष्ट चित्र आहे. पण ठाकरेंचा नेता बाजूला पडेल असं आव्हाड वागले की ती घडून गेलं याबद्दल मात्र राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT