Live : उद्धव ठाकरेंचा थेट मोदींवर निशाणा, RSS च्या दत्तात्रेय होसबाळेंचं केलं कौतुक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. त्यानंतर आम्हीच खरी असल्याचा दावाही शिंदेंकडून केला जातोय. सध्या खरी शिवसेना कुणाची या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असून, त्यापूर्वी होत असलेल्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे काय बोलणार हे महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

हिंदुत्व आणि वाढत्या महागाईवरुन उद्धव ठाकरेंनी थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. न बोलवता पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा केक खायला जाणार तुमचा नेता आणि तुम्ही मला हिंदुत्व शिकवता, असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र डागलं. त्याचबरोबर महागाईच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तात्रेय होसबाळे यांचं ठाकरेंनी कौतुक केलं.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे यांच्यात गेल्या आठवडाभरापासून टीझर वार सुरूये. अगदी शेवटच्या काही तासांपर्यंत एकमेकांवर टीझरमधून वार केले गेलेत. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली विधानंही एकमेकांना दाखवली जात आहे. शिंदे गटाकडून सातत्यानं बाळासाहेबांनी काँग्रेसबद्दल केलेल्या विधानाचा दाखला दिला जातोय. त्याला उत्तर म्हणून आता उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्याच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या विधानाचं बॅनर लावण्यात आलंय. त्याचबरोबर जुन्या भाषणाचा व्हिडीओही ट्विट करण्यात आलाय.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंची शिवाजी पार्कवर, तर एकनाथ शिंदेंची बीकेसी मैदानावर होणार सभा

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे… कुणाच्या सभेला होणार गर्दी? असा प्रश्न गेल्या आठवडाभरापासून चर्चेत आहे. अखेर अवघ्या काही वेळातच याचं उत्तर मिळणार आहे. दोन्ही बाजूनं शक्तीप्रदर्शनासाठी जोरदार ताकद लावण्यात आलीये. सध्या दोन्ही सभांच्या ठिकाणी गर्दी जमण्यास सुरूवात झाली असून, सध्या दोन्ही मैदानावर काय सुरूये, याचा घेतलेला आढावा…

Dasara Melava 2022 Live : एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात दिसणार प्रति बाळासाहेब ठाकरे!

शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यानिमित्त राज्याच्या विविध भागातून शिवसैनिक-कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जन्मगाव असलेल्या दरे तांबसह 105 गाव व जावळी तालुक्यातून हजारो कार्यकर्ते मुंबई येथे दसरा मेळाव्यासाठी रवाना झालेत

ADVERTISEMENT

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी साताऱ्यातून हजारो शिवसैनिक ट्रॅव्हल्स बस आणि खाजगी गाड्यांमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी साताऱ्यातले प्रति बाळासाहेब ठाकरे म्हणून ओळख असलेले भगवान शेवडे हे देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषेत मुंबईकडे रवाना झाले.

ADVERTISEMENT

नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करताना मोहन भागवत यांनी इंग्रजीला जास्त महत्व न देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, आमची मुले मातृभाषा बोलत नाही, अशी लोकांची तक्रार असते. मात्र लोक आपल्या मुलांना मातृभाषा शिकण्यासाठी पाठवतात का? याचा विचार होणं गरजेचं आहे.

आता नवीन शिक्षण धोरणात त्यावर भर देण्यात आला आहे. करिअरसाठी इंग्रजी आवश्यक नाही. विविध क्षेत्रांतील ८० टक्के यशस्वी लोक दहावीपर्यंत मातृभाषेतच शिकले आहेत. जर नवे शैक्षणिक धोरण यशस्वी करायचे असेल तर मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवे. स्वाक्षरी, नामफलक, निमंत्रणपत्रिका मातृभाषेत असायला हव्यात असा सल्लाही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याचवेळी शिवाजी पार्क मैदानावरील ठाकरे गटाच्या मेळाव्यात ईडीच्या अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या नावाची रिकामी खुर्ची ठेवली जाणार आहे. नेस्कोमध्येही त्यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली होती.

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा वारसा, पुढे घेऊन जाणं आमच्या वाट्याला आलं आहे. अशा भावना भाजप खासदाग डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केल्या. सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी, त्यांनी परळीच्या गोपीनाथ गडावर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की संघर्ष वाटायला आल्याशिवाय नेतृत्व घडत नसते, जितका संघर्ष मोठा तितकीच जित शानदार होते. पंकजाताईच्या वाट्याला संघर्ष तर आला आहेच. मी लहान असल्याने माझ्या वाट्याला संघर्ष नाही. तर पंकजाताईच्या वाटेल्या संघर्ष आहे, असे देखील प्रीतम मुंडे म्हणाल्या.

मुंबईत शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासोबतच आज सावरगांव येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आणि नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही दसरा मेळावा पार पडत आहे.

दरम्यान, नागपूरमधील संघाच्या दसरा मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाच्या गणवेशात उपस्थित आहेत. या सोबतच शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने हे देखील संघाच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमात पोहोचले आहेत.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा कायमच चर्चेत राहिला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची परंपरा ही बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी उद्धव ठाकरेंनी फारकत घेतली असा आरोप करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांनी बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेना दुभंगली आहे. 

शिवसेना दोन गटात विभागली गेल्याने यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतं आहेत. पहिला मेळावा अर्थातच शिवाजी पार्क या मैदानावर होणारा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आणि दुसरा आहे तो बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. त्यामुळे आज नेमकं कोण मैदान मारणार? ठाकरी तोफ की शिंदेशाही बाणा? कोणाची तोफ धडाडणार? या प्रश्नांची उत्तर संध्याकाळी मिळणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT