वैफल्यग्रस्तांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, संजय राऊत यांची Anil Deshmukh प्रकरणी प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. त्यांचे खासगी सचिव आणि स्वीय सचिव अशा दोघानाही अटक करण्यात आली आहे. तसंच अनिल देशमुख यानाही चौकशीसाठी हजर राहा म्हणून ईडीने समन्स बजावलं आहे. या प्रकरणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले संजय राऊत?

सत्ता गमावाल्यामुळे वैफल्यग्रस्तांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सत्ताधारी पक्षातील विनाकारण त्रास दिला जात आहे, आम्ही सुद्धा पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हे वाचलं का?

अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. मनी लॉण्ड्रिंग (PMLA) प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (26 जून) सकाळी त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाईल. अनिल देशमुख यांच्यावरही ईडी कारवाई करु शकते, असं समजतं.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED चा दणका, PA कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक

ADVERTISEMENT

शुक्रवारी ED चे अधिकारी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरी पोहचले. अनिल देशमुख आणि त्यांचा एक मुलगा हे दोघेही मुंबईतल्या निवासस्थानी होते. ही कारवाई एका डेप्युटी कमिश्नर लेव्हलच्या अधिकाऱ्याचं स्टेटमेंट घेतल्यानंतर ईडीने केली. आता मुंबई पोलिसांच्या Enforcement wing चे इनचार्ज डीसीपी राजू भुजबळ हे आहेत. त्यांनी याआधी सामाजिक सेवा विभागही सांभाळला आहे त्यावेळी त्यांनी पब्स, हुक्का पार्लर्स, डान्स बार, बार आणि रेस्तराँ यांच्यावरही धाडी मारल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी काही पोलिसांचीही या प्रकरणी चौकशी होणार आहे.

ADVERTISEMENT

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या अधिकाऱ्यांना सुमारे चार कोटी रूपये रक्कम जी साधारण 12 बार आणि रेस्तराँ मालक यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात घेण्यात आली होती त्याचा सुगावा लागला आहे. सचिन वाझेंनी ही रक्कम गोळा केली होती. हे पैसे महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या काही शेल कंपन्यांमार्फत अनिल देशमुख यांच्याकडे वळवण्यात आली. ही कंपनी अनिल देशमुख यांच्या जवळच्या नातेवाईकाची आहे असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT