मराठी मालिकांचं शूटींग पुन्हा रखडलं; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटींगवर बंदी
कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. तर महाराष्ट्रानंतर गोव्यात देखील कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रानंत गोव्यामध्ये देखील मालिका तसंच फिल्म्सच्या शूटींगवर बंदी आणण्यात आली आहे. गोव्यामध्ये जवळपास 30 पेक्षा अधिक ठिकाणांवर शूटींग सुरु आहेत. अशात गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विजय […]
ADVERTISEMENT
कोरोनाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. तर महाराष्ट्रानंतर गोव्यात देखील कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रानंत गोव्यामध्ये देखील मालिका तसंच फिल्म्सच्या शूटींगवर बंदी आणण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
गोव्यामध्ये जवळपास 30 पेक्षा अधिक ठिकाणांवर शूटींग सुरु आहेत. अशात गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विजय सरदेसाई यांनी फातोर्डा आणि मडगाव या ठिकाणी शूटिंग सुरू असल्याने कोरोना रूग्णांची संख्या अधिक वाढत असल्याचा आरोप केलाय. त्यानंतर विजय सरदेसाई यांनी यांनी ‘सूर नवा ध्यास नवा’ शोच्या सेटवर जाऊन शूटींग बंद करण्याची मागणी केली. यानंतर गोवा सरकारने 10 मे पर्यंत गोव्यात मालिकांच्या शूटींगवर बंदी आणली आहे.
मनोरंजनाला नो ब्रेक; मराठी मालिकांचं शूटींग महाराष्ट्राबाहेर सुरु
हे वाचलं का?
महाराष्ट्रात शूटींगवर बंदी आणली आणि त्यानंतर ‘आई माझी काळू बाई’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, अग्गंबाई सूनबाई, या मालिकाचं शूटींग गोव्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. योग्य पद्धतीने काळजी घेत तसंत नियमांचं पालन करत शूटींग सुरु होतं. मात्र आता गोवा सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा मालिकांचं शूटींग रखडलं आहे.
Extremely happy that we @FatordaForward ended film shooting which was supposed to go on till the 12th by the insensitive RB mgmt. My act has paved the way for the #SwabCollectionCentre to be shifted there from the #SGDH which means more beds for patients in need, and less deaths! pic.twitter.com/UtgQHlc2pQ
— Vijai Sardesai (@VijaiSardesai) May 6, 2021
महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना सरकारने कडक निर्बंध जारी केले. यामध्ये महाराष्ट्रात सिनेमा तसंच मालिकांच्या शूटींगला परवानगी दिली नाही. त्यामुळे अनेक मराठी मालिकांनी विविध राज्यांमध्ये शूटींग करण्याचा निर्णय़ घेतला. यानुसार काही मराठी मालिकांचं शूटींग महाराष्ट्राजवळत गोव्यात करण्यात येत होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT