सोलापुरातील रक्तपेढ्या व्हेंटिलेटरवर, आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे राज्य कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे, दररोज महत्वाच्या शहरांमध्ये वाढत जात असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे. काही ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याच्या बातम्याही समोर आल्या. त्यातच आता राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याचंही समोर येतंय. सोलापूर शहरातील रक्तपेढ्या या व्हेंटिलेटरवर असून पुढचे आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये वारंवार कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रक्ताचा तुटवडा भासायला लागल्यामुळे प्रशासनासमोरच्या चिंतेत भर पडत चालली आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापुरात रमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचंही समोर आलं होतं.

ADVERTISEMENT

२५ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

कोविड लसीकरणामुळे देखील रक्तसंकलन कमी !

हे वाचलं का?

दरम्यान राज्यात सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेमुळे देखील रक्तसंकलन कमी पडत असल्याचं समोर आलंय. कारण ४५ वर्षे वयापुढील लसीकरण घेतलेल्या नागरिकांना एक ते दीड महिना रक्तदान करू नका असंही आवाहन केलं जात आहे. याचाच परिणाम थेट रक्तपेढ्यांवर होत आहे. फक्त एक आठवडा पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती गोपाबाई दमानी ब्लड बँकेतील प्रशासकीय अधिकारी अशोक नावरे यांनी दिली.

कोरोनाचा वाढता कहर : केंद्राचं पथक राज्य सरकारच्या मदतीला येणार

ADVERTISEMENT

दररोज 100 जणांनी रक्तदान केले तर हा रक्ततुटवडा कमी होईल –

ADVERTISEMENT

सोलापूर शहरातील कोविड रुग्णांची वाढत चाललेली संख्या पाहता दररोज १०० जणांनी रक्तदान करणे गरजेचे आहे. आठवड्याला १३० थैलेसिमिया रुग्णांना रक्त दिले जाते. यांसाठी काही प्रमाणात रक्तसाठा हा राखीव ठेवावा लागतो. सोलापुर करांनी पुढाकार घेऊन शहर व जिल्ह्यात असलेल्या १६ रक्तपेढ्या मध्ये जाऊन रक्तदान करावे. अन्यथा रक्ताच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव जाऊ शकतो असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात रक्ताचा तुडवडा असून लोकांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं.

नागपुरात आरोग्य व्यवस्थेवर ताण, कोविड-नॉन कोविड रुग्णांना एकाच बेडवर उपचार

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT