सोलापूर : काडादी विरुद्ध काडादी रंगणार सामना; 17 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूरमधील प्रसिद्ध सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी एकूण 20 पैकी तीन जागा बिनविरोध निवडल्या गेल्या असून, उर्वरित 17 जागांसाठी 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या विरोधात संगमेश्वर काडादी यांनी दंड थोपटले आहेत. शुक्रवारी कट्टर विरोधक सिद्रमाप्पा अब्दुलपुरकर यांच्यासह एकूण 90 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 24 जणांपैकी कोण निवडणूक येतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. (shri Siddheshwar Sugar Factory Election-2021)

ADVERTISEMENT

शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. दुपारी तीनपर्यंत अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गर्दी केली होती. निवडणुकीतील उमेदवारांची यादी सोमवारी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली.

हे वाचलं का?

महिला उमेदवार मतदारसंघातून दोन जागांवरची निवडणूक बिनविरोध झाली असून, श्रीदेवी माशाळे आणि मंगला काडादी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच संस्था मतदारसंघातून धर्मराज काडादी यांचे सुपुत्र अण्णाराव काडादी यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसाधारण मतदारसंघात 15 जागांसाठी 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एसीएसटी मतदारसंघात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. 17 जागांसाठी आता 25 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

ADVERTISEMENT

20 जागांसाठी एकूण 160 जणांनी 180 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी दरम्यान यातील 43 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर झाले, तर 117 उमेदवारांपैकी 90 उमेदवारांनी मंगळवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 17 जागांसाठी आता 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT