पिंपरी-चिंचवड : हॉटेलमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा पथकाने ४ महिलांची केली सुटका
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने एका हॉटेलवर छापेमारी करत सुरु असलेला वेश्याव्यवसायाचा अड्डा उध्वस्त केला आहे. पोलिसांनी या कारवाईत ४ महिलांची सुटका केली असून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. दिघी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या डुडुळगाव येथील हॉटेल अद्वैतचे मालक दिपक जाधव आणि मॅनेजर संभाजी सूर्यवंशी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करत […]
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने एका हॉटेलवर छापेमारी करत सुरु असलेला वेश्याव्यवसायाचा अड्डा उध्वस्त केला आहे. पोलिसांनी या कारवाईत ४ महिलांची सुटका केली असून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
दिघी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या डुडुळगाव येथील हॉटेल अद्वैतचे मालक दिपक जाधव आणि मॅनेजर संभाजी सूर्यवंशी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करत होते. सामाजिक सुरक्षा पथकाला याबद्दलची माहिती समजली असता त्यांनी बुधवारी शहानिशा करण्यासाठी याठिकाणी छापेमारी केली.
पिंपरी-चिंचवड : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या
हे वाचलं का?
या वेळी चार महिलांची सुटका करण्यात पोलीसांना यश आलं असून हॉटेलचा मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये अवैध पद्धतीने सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाविरुद्ध ही मोहीम यापुढेही अशाच पद्धतीने कायम राहील असा इशारा पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिला आहे.
Crime : मुल होण्यासाठी आयुर्वेदीक औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT