Maharashtra SSC Result 2021: मोठी बातमी… MSBSHSE 10th निकालाची तारीख जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर होणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने याबाबत एक परिपत्रक जारी करुन दहावीच्या निकालासंबंधी माहिती दिली आहे. पाहा परिपत्रकात नेमकी काय माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) लेखी परीक्षा दिनांक 29.04.2021 ते 20.05.2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. पण कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे राज्य शासनाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 12 मे 2021 रोजी जाहीर केला होता.

हे वाचलं का?

त्यानंतर 28 मे 2021 रोजी 10 वीच्या निकालासाठी शिक्षण विभागाकडून मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. त्यानुसार 10 जून 2021 रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण वेबिनार घेण्यात आले. तर 23 जून 2021 ते 2 जुलै 2021 माध्यमिक शाळांनी संगणक प्रणालीमध्ये गुण नोंदवण्यात आले.

त्यानुसार 3 जुलै 2021 ते 15 जुलै 2021 पर्यंत मंडळामार्फत निकाल तयार करण्यात आला. त्यानुसार दिनांक 16 जुलै 2021 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र दहावी निकाल 2021 कसा पाहाल? (How to Check Maharashtra SSC Result 2021)

ADVERTISEMENT

mahresult.nic.in वर नेमका निकाल कसा पाहाल?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने SSCचा निकाल हा result.mh-ssc.ac.in या अधिकृत वेबसाईटववर जाहीर करण्यात येणार आहे.

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन

  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र दहावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.

  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.

  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

  • समजा, तुमचा सीट नंबर M234897 असेल आणि तुमच्या आईचे नाव मनिषा असं असेल तर तुम्ही M234897 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच MAN असं टाकावं लागेल.

  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

10th and 12th Result: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी

महाराष्ट्र दहावीचा निकाल 2021: मोबाइलवर कसा पाहता येणार निकाल?

विद्यार्थी आपला निकाल मोबाईल फोनद्वारे देखील पाहू शकतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी त्यांना इंटरनेटची गरज नसेल. SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC ” असं टाकून 57766 वर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या स्वरुपात येईल. इंटरनेट नसलेल्यांसाठी ही सोपी पद्धत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT