पुढच्या दोन दिवसात कोल्हापुरात लागणार कठोर लॉकडाऊन-हसन मुश्रीफ
पुढच्या दोन दिवसात कोल्हापुरात कठोर लॉकडाऊन लागणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कोल्हापुरात कठोर लॉकडाऊनची स्थिती येऊन ठेपली आहे हे आम्हाला आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं. कोल्हापुरातला मृत्यूचं प्रमाण हा देशातलं उच्चांकी प्रमाण आहे, गेल्या सहा ते सात दिवस हे प्रमाण कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दोन दिवसात कठोर […]
ADVERTISEMENT
पुढच्या दोन दिवसात कोल्हापुरात कठोर लॉकडाऊन लागणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कोल्हापुरात कठोर लॉकडाऊनची स्थिती येऊन ठेपली आहे हे आम्हाला आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं. कोल्हापुरातला मृत्यूचं प्रमाण हा देशातलं उच्चांकी प्रमाण आहे, गेल्या सहा ते सात दिवस हे प्रमाण कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दोन दिवसात कठोर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल. गोकूळच्या निवडणुका होत्या त्यामुळे आपण लॉकडाऊन संदर्भातला निर्णय घेऊनही तो मागे घेतला. मात्र त्यामुळे कोरोना संसर्ग वाढला, तरूण मुलांचेही मृत्यू होत आहेत त्यामुळे कोल्हापुरात कठोर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले हसन मुश्रीफ?
सांगली, सातारा, बारामती या ठिकाणीही लॉकडाऊन झाला आहे. आपल्याकडे लॉकडाऊन झाला नाही त्याचा फटका आपल्याला असा बसला आहे की आपल्याकडे रूग्ण वाढू लागले आहेत. ऑक्सिजनची आवश्यकता असलेले रूग्ण वाढू लागले आहेत. तरूण मुलांचा मृत्यू होऊ लागला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, लक्षणं दिसल्यानंतर तातडीने चाचणी करून घ्या. कोरोना हा गंभीर आजार आहे अंगावर काढण्याचा आजार नाही हे सगळ्यांना मी पुन्हा सांगतो आहे.
हे वाचलं का?
Corona मुक्त झाल्यानंतर टूथब्रश बदललाच पाहिजे, का? जाणून घ्या
केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की लक्षणं दिसत असतील तरीही रूग्णाला अॅडमिट करून घ्या असं या निर्णयानुसार स्पष्ट झालं आहे. RTPCR चाचणीचा अहवाल दाखवण्याचीही गरज नसणार आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणं असतील तरीही तातडीने रूग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल व्हा. उपचारांसाठी दुर्लक्ष करू नका.
ADVERTISEMENT
आज कोल्हापुरात पालकमंत्री नाहीत, त्यामुळे येत्या दोन दिवसात आपण लॉकडाऊन करणार आहोत. हा लॉकडाऊन कठोर असणार आहे. मेडिकल आणि दूधसेवा वगळून बाकी सगळ्या सेवा बंद करणार आहोत हा निर्णय किमान 10 ते 14 दिवसांसाठी केला जाणार आहे. सध्या बेड नाहीत, आयसीयू बेड नाहीत, औषधं नाहीत, रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा आहे त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय हा घ्यावाच लागणार आहे असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT