राष्ट्रवादी नवरदेव, शिवसेना नवरी आणि काँग्रेस लाज नसलेले वऱ्हाडी; सुजय विखेंचा टोला
राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून राजकीय गदारोळ सुरू आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचे काही नेते ईडी आणि आयकरच्या रडावर असून, केंद्रातील सरकार हे सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावर बोलताना खासदार सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीचा संसार कशा पद्धतीने सुरू आहे, यावर भाष्य करत टोलेबाजी केली. माध्यमांशी बोलताना सुजय विखे-पाटील म्हणाले, “आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला […]
ADVERTISEMENT
राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून राजकीय गदारोळ सुरू आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचे काही नेते ईडी आणि आयकरच्या रडावर असून, केंद्रातील सरकार हे सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावर बोलताना खासदार सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीचा संसार कशा पद्धतीने सुरू आहे, यावर भाष्य करत टोलेबाजी केली.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना सुजय विखे-पाटील म्हणाले, “आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या. तुम्ही चोऱ्या केल्या. पैसे खाल्ले. भ्रष्टाचार केला. बंगले बांधले. आता त्यांना पकडलं जातंय. मी मुख्यमंत्र्यांचं परवाचं भाषण ऐकलं. मंत्र्यांनी काठ्या खाल्ल्या, याचा अर्थ त्यांना पकडलं जाऊ नये, असा होऊ शकत नाही ना?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“देशामध्ये सत्तेचा सर्वाधिक वापर कुणी केला आहे, हे आणीबाणीच्या काळात जिवंत उदाहरण लोकांनी पाहिलं आहे. कश्मीर फाईल्सच्या माध्यमातून जे कश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आज सत्तेतून बाहेर असलेल्यांना बघायला मिळाला. ज्या लोकांनी सत्तेच्या माध्यमातून त्रास दिला नसेल, पण पैसे खाऊन कारखाने बांधले. खासगीकरण केलं. गाड्या घेतल्या. बंगले बांधले. संस्था घेतल्या. खासगीकरण केलं. हा सुद्धा गरिबांनी कर भरलेला पैसा होता. जो गरिबांसाठी वापरता आला असता.”
“ज्याचं मन साफ आहे, त्याने भीती बाळगू नये. शेवटी कागदपत्रं आहेत. न्यायालय आहे. जर एखाद्याने चोरी केलीच नसेल, तर घाबरण्याचं कारणच नाही. टीव्हीवर येऊन बोलू नका. कागदपत्रं द्या आणि सांगा की आम्ही स्वच्छ आहोत. जर तुम्ही चोऱ्या केल्या, असतील तर तुम्हाला धरायचंही नाही असा तर नियम नाही ना?”, असा उलट सवाल त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना केला.
हे वाचलं का?
“महाविकास आघाडीचा हा संसार असा आहे की, यामध्ये लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी नवरदेवाच्या भूमिकेत आहे. त्यांनी काहीही मनमानी केली, तरी त्यांना कुणी काही बोलत नाही. शिवसेना मूक पत्नीसारखी आहे. काँग्रेस हे वऱ्हाडी आहेत.”
“त्यांना (काँग्रेसला) लग्नाची पत्रिकाही नव्हती, तरी न बोलवलेल्या पाहुण्यांप्रमाणे जेवायला गेले. त्यांना लाज नाही. त्यांना जेवायला कुणी बोलवलेलं नाही, पण ते जेवणाचं ताटही सोडेना. त्यांना मारलं, तर खाली बसून जेवतील, पण फुकट जेवण सोडायला तयार नाही. नवरा मस्त मजा करतोय आणि मूक बायकोला सगळं सहन करायचं आहे. असं सगळं सुरू आहे”, अशी टोलेबाजी सुजय विखे-पाटील यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT