संतापजनक! आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरचं नाव MPSC च्या मुलाखतीच्या यादीत
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातल्या स्वप्नील लोणकर या तरूणाने आत्महत्या केली. या वर्षी 29 जूनला त्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं होतं. या घटनेला सहा महिने झाल्यानंतर आता MPSC च्या कारभाराचं संतापजनक उदाहरण समोर आलं आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नील लोणकरचं नाव आलं आहे. या प्रकारामुळे स्वप्नीलचे कुटुंबीय […]
ADVERTISEMENT
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातल्या स्वप्नील लोणकर या तरूणाने आत्महत्या केली. या वर्षी 29 जूनला त्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं होतं. या घटनेला सहा महिने झाल्यानंतर आता MPSC च्या कारभाराचं संतापजनक उदाहरण समोर आलं आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2019 च्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नील लोणकरचं नाव आलं आहे. या प्रकारामुळे स्वप्नीलचे कुटुंबीय आणि एमपीएसी विद्यार्थी यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त होतो आहे.
ADVERTISEMENT
माझ्याकडे एमपीएससी आयोगाचं पत्र आहे. त्यात स्वप्नीलच्या मृत्यूचा उल्लेख आहे. महाराष्ट्र सरकारलाही स्वप्नीलच्या मृत्यूबाबत माहिती आहे. तरीही एमपीएससीच्या यादीत त्याचं नाव आहे याचा अर्थ स्वप्नील कच्चा नव्हता, हुशार होता. एमपीएसीनेच माझ्या मुलाचा बळी घेतला आहे. तसंच आता यादीत नाव लिहून आमच्या जखमेवर मीठही एमपीएसीने चोळलं आहे अशी प्रतिक्रिया स्वप्नील लोणकरच्या वडिलांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली आहे.
MPSC ला स्वायतत्ता म्हणजे स्वैराचार नाही, स्वप्नील लोणकरची आत्महत्या दुर्दैवी-फडणवीस
हे वाचलं का?
स्वप्नील लोणकरने त्याच्या सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं होतं?
‘MPSC हे मायजाल आहे यात पडू नका ! येणार्या प्रत्येक दिवसा सोबत वय आणि ओझं वाढत जातं. Confidence तळाला पोहोचतो आणि self doubt वाढत जातो. 2 वर्ष झालेत pass out होऊन आणि 24 वय संपत आलंय, घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेल कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना!
ADVERTISEMENT
कोरोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये. फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य continue होऊ शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! 100 जीव वाचवायचे होते, मला डोनेशन करून, 72 राहीले….जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT