पुतण्या तन्मयने लस घेतल्याने काका देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल
आज दुपारपासून सोशल मीडियावर एकच फोटो व्हायरल होतो आहे तो म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतल्याचा. तन्मय फडणवीस यांचं वय 45 नसतानाही त्यांनी लस कशी घेतली हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट या ठिकाणी तन्मय फडणवीस यांनी लस घेतली आणि […]
ADVERTISEMENT
आज दुपारपासून सोशल मीडियावर एकच फोटो व्हायरल होतो आहे तो म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतल्याचा. तन्मय फडणवीस यांचं वय 45 नसतानाही त्यांनी लस कशी घेतली हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट या ठिकाणी तन्मय फडणवीस यांनी लस घेतली आणि तो फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केला.
ADVERTISEMENT
तन्मय फडणवीस हे देवेंद्र फडणवीस यांच्या काकूंचे म्हणजेच शोभा फडणवीस यांचे नातू आहेत आणि अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आहे. हा फोटो तन्मयने सोशल मीडियावर टाकताच देवेंद्र फडणवीस ट्रोल होऊ लागले.
हे वाचलं का?
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! pic.twitter.com/oN49h5xiiC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 19, 2021
काँग्रेसने काय प्रश्न विचारले आहेत?
तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का?
ADVERTISEMENT
फ्रंटलाईन वर्कर आहे का?
ADVERTISEMENT
आरोग्य कर्मचारी आहे का?
जर नसेल तर त्याला लस कशी काय दिली गेली?
भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणेच लसींचाही गुप्त साठा आहे का?
सचिन सावंत यांनी काय ट्विट केलं आहे?
बाअदब बामुलायचा होशियार शहेनशाह ए हिन्द आलमपनाह नरेंद्र मोदी जी के शागिर्द और मोदीया सल्तनत के सिपासालार देवेंद्र फडणवीस जी के भतीजे नवाबजादे तन्मय फडणवीस जी वैक्सीन लेने पधार रहे हैं।
कोई न पुछो उनसे उमर। फडणवीस जी की लगी है जो मुहर। उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है। असं ट्विट करत तन्मय फडणवीस यांच्या लस घेण्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
बाअदब बामुलायजा होशियार
शहेनशाह ए हिन्द आलमपनाह नरेंद्र मोदी जी के शागिर्द और मोदीया सल्तनत के सिपासालार
देवेंद्र फडणवीस जी के भतीजे नवाबजादे तन्मय फडणवीस जी वैक्सीन लेने पधार रहे हैं।
कोई न पुछो उनसे उमर।
फडणवीस जी की लगी है जो मुहर।
उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है। pic.twitter.com/sgffzy8aob— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 19, 2021
नेमकं काय घडलं?
तन्मय फडणवीस यांचा लसीकरण करतानाचा फोटो हा त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नेटकऱ्यांनी आणि काँग्रेस पक्षाने ट्विटर, फेसबुकवर चांगलेच ट्रोल केले. माजी मुख्यमंत्री यांच्या पुतण्याला जर सगळे नियम शिथील आहेत. मग नागपूर कॅन्सर इन्सस्टि्युटने 18 वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करावे अशी मागणी होऊ लागली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर तन्मय फडणवीस यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तन्मय फडणवीस यांचं वय हे अंदाजे 22 ते 25 वर्षे असल्याची माहिती आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सध्या देशात 45 वर्षे आणि त्यापुढील नागरिकांना लस देण्यात येते आहे. अशात तन्मय फडणवीस यांनी लस कशी घेतली हा प्रश्न विचारला जातो आहे.
नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे असलेले शैलेश जोगळेकर हे संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे तर ही लस तन्मय फडणवीस यांना सहज मिळाली का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT