Tauktae Cyclone: चक्रीवादळाने दिशा बदलली, पाकिस्तानवर धडकणारं वादळ आता महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने!
मुंबई: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ‘तौकताई’ हे चक्रीवादळ (Tauktae Cyclone) घोंघावत भारताच्या (India) दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. या वादळाचा (Cyclone) सर्वाधिक फटका गोवा (Goa) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) किनारपट्टीला बसण्याची अधिक शक्यता असल्याने प्रशासनाने त्यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. पण या वादळाबाबतची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे वादळ सातत्याने आपल्या दिशेमध्ये बदल […]
ADVERTISEMENT
मुंबई: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ‘तौकताई’ हे चक्रीवादळ (Tauktae Cyclone) घोंघावत भारताच्या (India) दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. या वादळाचा (Cyclone) सर्वाधिक फटका गोवा (Goa) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) किनारपट्टीला बसण्याची अधिक शक्यता असल्याने प्रशासनाने त्यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. पण या वादळाबाबतची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे वादळ सातत्याने आपल्या दिशेमध्ये बदल करत आहे. सुरुवातीला हे वादळ पाकिस्तानच्या (Pakistan) कराची आणि जवळच्या प्रदेशात धडकणार होतं. पण दोन दिवसामध्ये या वादळाने आपली दिशा बदलल्याने त्याच्या लँडिंग पॉईंट हा गुजरातमध्ये (Gujarat) असणार आहे. त्यामुळे आता येथील प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे.
ADVERTISEMENT
खरं तर दोनच दिवसापूर्वी या वादळाचं लँडिंग पॉईट हा पाकिस्तानाच्या कराची जवळील एका गावात असल्याचं सॅटेलाइट चित्राच्या माध्यमातून समजत होतं. पण काल (14 मे) दिवसभरात या वादळाने आपली वाट बदलली असून ते आता दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशासह गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यात धडकणार आहे. यावेळी या चक्रीवादळाचा मुख्य गाभा हा गुजरातवर धडकणार असल्याने येथील प्रशासनाची चिंता बरीच वाढली आहे. कारण जर वादळाचा मुख्य गाभा हा येथील परिसरात धडकणार असेल तर येथे वाऱ्याचा प्रचंड वेग असेल. यासोबतच मुसळधार पावसाच्या सरी देखील बरसू शकतात.
जर तौकताई चक्रीवादळाचं लाँडिंग पॉईंट गुजरातमध्ये असेल तर मात्र, येथील प्रशासनाला आणि एनडीआरएफच्या तुकडीला आत्तापासूनच सज्ज राहावं लागणार आहे. कारण चक्रीवादळाने आतापर्यंत केलेला प्रवास आणि आपली कमावलेली ताकद ही त्याच्या गाभ्यात असते. अशावेळी हाच गाभा गुजरातवर धडकणार असल्याने येथे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय जीवितहानी टाळण्यासाठी आतापासूनच येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागणार आहे.
हे वाचलं का?
पाकिस्तानवर धडकणार वादळ गुजरातकडे कसं वळलं?
तौकताई हे वादळ सुरुवातीला पाकिस्तानच्या किनारपट्टी भागात धडकणार होतं. पण गेल्या काही तासात या वादळाने केलेला प्रवास आणि कमावलेली क्षमता याने त्याची दिशा बरीच बदलली आहे. त्याचं लँडिंग पॉईंट तूर्तास तरी गुजरातच्या किनारपट्टी भागात असल्याचं दिसतं आहे. वादळ हे खोल समुद्रात तयार होत-होत पुढे सरकत असतं त्यामुळे वादळाची दिशा हे बऱ्याचदा बदलते. वाऱ्याच वेग यामुळे वादळ आपली दिशा बदलत राहतं. त्यामुळेच सुरुवातीला जे वादळ पाकिस्तानवर जाऊन धडकणार होतं ते आता गुजरातवर धडकणार असल्याच सॅटेलाइट इमेजवरुन तरी पाहायला मिळतं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, असं असलं तरी हे वादळ लँडिंग पॉईंटपर्यंत पोहचण्यास अद्याप तीन दिवसांचा कालावधी दाखवला जात आहे. त्यामुळे यादरम्यान, जर पुन्हा वाऱ्याचा वेग वाढला किंवा कमी झाला तर हे वादळ पुन्हा दिशा बदलू शकतं. त्यामुळे सध्या वादळाची नेमकी वाटचाल कशी आहे याकडे हवामान खातं नजर ठेऊन आहे. जसजसं वादळ पुढे सरकू लागेल तसतशा स्वरुपाचे आदेश आणि अलर्ट हे प्रशासनाकडून वारंवार दिले जातील. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आधीच सुरक्षित स्थळी जाऊन राहणं हे योग्य ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT