महाराष्ट्राची चिंता कायम, आज ३६ हजार ९०२ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातली परिस्थिती अजुनही रुळावर येण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठकीत रविवारी रात्रीपासून संचारबंदीची घोषणा केली. यानंतर आज राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. आज राज्यात ११२ जणांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ८२ हजार ४५१ सक्रीय रुग्ण असल्यामुळे राज्य सरकारसमोरील चिंतेत भर पडली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या शहरांमधली गर्दी टाळणे, वाढच्या संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने रविवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याची आरोग्य व्यवस्था कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे असं म्हटलं आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार की नाही याबद्दल बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी, “मला लॉकडाउन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतू राज्यातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.” हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स आणि औषधांची उपलब्धता व त्यात करायची वाढ या गोष्टींकडे लक्ष द्यावं असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

कडक निर्बंधांचे संकेत

जनतेने कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळले नाहीत तर नाईलाजाने येत्या काही दिवसांमध्ये अधिक कठोर निर्बंध लावावे लागतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू मात्र डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार? हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT