देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करून अहंकारी सरकारला झुकवलं-राहुल गांधी
केंद्र सरकारने आज कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्या दरम्यान ही महत्त्वाची घोषणा केली तसंच येत्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे संसदेतही रद्द करण्याची प्रक्रिया पार पडेल असंही त्यांनी सांगितलं. अशात आता विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी […]
ADVERTISEMENT
केंद्र सरकारने आज कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्या दरम्यान ही महत्त्वाची घोषणा केली तसंच येत्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे संसदेतही रद्द करण्याची प्रक्रिया पार पडेल असंही त्यांनी सांगितलं. अशात आता विविध प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं एक जुनं ट्विट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे राहुल गांधी?
देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रह करून अहंकारी सरकारला झुकवलं. अन्यायाच्या विरोधात हा विजय अभिनंदन करण्याजोगाच आहे. जय हिंद, जय हिंदका जय जवान. असं ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
हे वाचलं का?
देश के अन्नदाता ने सत्याग्रह से अहंकार का सर झुका दिया।
अन्याय के खिलाफ़ ये जीत मुबारक हो!जय हिंद, जय हिंद का किसान!#FarmersProtest https://t.co/enrWm6f3Sq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2021
प्रियंका गांधी यांनी काय म्हटलं आहे?
प्रियंका गांधी यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाणीव झाली आहे की कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधात जाऊन देश चालवू शकत नाही. पण ते हे का करत आहेत? निवडणुका जवळ येत असून ही परिस्थिती योग्य नाही अशी त्यांना जाणीव झाली असल्याचं देशवासियांनाही कळत असेल. सर्व्हेमध्ये परिस्थिती त्यांच्या बाजूने नाही असं स्पष्ट दिसत आहे. यामुळेच निवडणुकीच्या आधी ते माफी मागत आहेत.’ असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं.
ADVERTISEMENT
मोदींनी नेमकी काय घोषणा केली?
ADVERTISEMENT
“कृषी कायद्यासंदर्भातील सर्व घडामोडी देशवासियांना माहिती आहेत. मी आज देशवासीयांची माफी मागतो. खऱ्या मनाने आणि पवित्र ह्रदयाने सांगू इच्छितो की आमच्या तपश्चर्येत उणीव राहिली. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशाप्रमाने असलेलं सत्य आम्ही काही शेतकरी बांधवांना समजून सांगू शकलो नाही. आज गुरूनानकजींचा पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणाला दोष देण्याचा नाही. मी देशाला हे सांगण्यासाठी आलोय की, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल”, अशी घोषणा मोदी यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT