अयोध्येमध्ये ‘रामसेतू’चा झाला शुभारंभ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा राम सेतू हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचा मुहूर्त पार पडला आहे. मुहूर्तासाठी या सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट अयोध्येत पोहोचली होती. सध्या राम सेतू या सिनेमाची सगळीकडे चर्चा असून अक्षय सध्या या सिनेमाच्या कामात व्यस्त आहे.

ADVERTISEMENT

अक्षय कुमारने यासंदर्भत ट्विट करत माहिती दिलीये. यावेळी त्याने नुसरत भरूचा आणि जॅकलीन फर्नांडिससोबतचा फोटो शेअर केला आहे. त्याचप्रमाणे अक्षयने अजून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आरती सुरु असल्याचं दिसतंय. तर या फोटोला अक्षयने आज श्री अयोध्येत ‘राम सेतु’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्याआधी भगवान श्री रामाचा आशीर्वाद मिळाला. जय श्री राम!, असं कॅप्शन दिलं आहे.

या सिनेमामध्ये अक्षयसोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस तसंच नुसरत भरूचा या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे अक्षयने नुकतंच आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT